डेंग्यू - ८० टक्के रुग्णांच्या घरात एडीस इजिप्टाय डासांची उत्पत्ती स्थाने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2015

डेंग्यू - ८० टक्के रुग्णांच्या घरात एडीस इजिप्टाय डासांची उत्पत्ती स्थाने

मुंबई / प्रतिनिधी 

महापालिकेकडे गेल्या दोन वर्षांत उपलब्ध झालेल्या आकडेवारीचा अभ्यास केला असतागेल्या दोन वर्षांत एकूण डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणाऱया एडीस इजिप्टाय डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली होतीही बाब लक्षात घेतानागरिकांनी त्यांच्या घरामध्ये व घराशेजारील परिसरात साठविलेले किंवा साचलेले पाणी सात दिवसांपेक्षा अधिक काळ राहणार नाहीयाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहेत्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावाअसे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे.

डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणाऱया एडीस इजिप्टाय डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होतेतसेच या डासांच्या साठलेल्या पाण्यातील अवस्था ह्या साधारणपणे आठ दिवसांच्या असतातही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक ठिकाणी साचलेले स्वच्छ पाणी अधिक काळ राहणार नाहीयाकरीता विविध प्रकारच्या उपाययोजना महापालिकेद्वारे करण्यात येत आहेत.  डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणारे डास साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच प्रजोत्पादन करतात तसेच या डासांचे साठलेल्या पाण्यातील अवस्था ह्या आठ दिवसांच्या असतातया दोन्ही बाबी लक्षात घेता आपल्या घरातील पिंपड्रमबादल्या,पाणी साठविण्याची भांडी यातील पाणी आठवडयातून किमान एक वेळा पूर्णपणे बदलले पाहिजेतसेच ही सर्व भांडी आठवडयातून किमान एक दिवस तरी पूर्णपणे कोरडी ठेवून तो दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे आपल्या सर्वांच्याच आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहेअशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.


तसेच यापूर्वीच्या सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार फेंगशुई झाडबांबू प्लॅन्ट्समनीप्लँट्स यासारखी शोभिवंत झाडेघराच्या सज्जामध्ये (गॅलरीकिंवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणाऱया ताटल्या (प्लेट्स), वातानुकुलन यंत्रणाशीतकपाट (रेफ्रिजरेटरयासारख्या विविध बाबींमध्ये अल्प प्रमाणात असलेल्या स्वच्छ पाण्यात देखील डेंग्यू विषाणू वाहक डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली आहेततरी या सर्व बाबींमध्ये पाणी सात दिवसांपेक्षा अधिक काळ साचलेले किंवा साठविलेले राहणार नाही,याचीदेखील काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे असेही महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर घराशेजारील परिसरात असणारे टायर्सनारळाच्या करवंट्याफोडलेली शहाळीथर्माकोलपत्रे,पन्हाळेघरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या विविध वस्तुंमध्ये पावसाचे पाणी साचते व या स्वच्छ पाण्यातही डेंग्यूचे विषाणूवाहक डास अंडी घालतातही बाब आवर्जून लक्षात घेऊन नागरिकांनी त्यांच्या परिसरात अशा प्रकारच्या वस्तुंमध्ये पाणी साचलेले नसल्याची खातरजमा करुन घ्यावी व अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू शक्य तितक्या लवकर नष्ट कराव्यातअसेही आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS