महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे यापूर्वी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पाणी नमुन्यांची चाचणी केली असता अनेक नमुन्यांमध्ये 'ई-कोलाय' जीवाणू आढळून आले होते. ही बाब लक्षात घेता पावसाळयात पसरणाऱया जलजन्य व इतर आजारांना प्रतिबंध व्हावा यासाठी महापालिका सर्व स्तरावर कार्यवाही करीत आहे. याअंतर्गत तसेच अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध सुरु असलेल्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून महापालिकेच्या 'अतिक्रमण निर्मूलने व फेरीवाल्यांचे नियमन' या खात्यामार्फत अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमित स्वरुपात कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दिनांक १ जून ते २६ जून २०१५ या कालावधीत खाद्यपदार्थांची व इतर सामानांची विक्री करणाऱया अश्या एकूण १४८१ अनधिकृत हातगाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. या जप्त करण्यात आलेल्या हातगाडय़ा यंत्राच्या सहाय्याने नष्ट करण्याची कार्यवाही महापालिकेच्या स्तरावर करण्यात येत आहे.
Post Top Ad
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

