मुंबई : कोस्टल रोडच्या प्रकल्प अहवालाचा आढावा घेण्याकरिता कंपनीची नियुक्ती करण्याची प्रक्रिया बृहन्मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. या प्रक्रियेवर पालिका प्रशासन तब्बल ६00 कोटींचा खर्च करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. ही रक्कम एकूण प्रकल्प खर्चाच्या ५ टक्के असून अहवालात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी उचललेले हे पाऊल असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
१२ हजार कोटींचा कोस्टल रोड प्रकल्प हा विस्तृत प्रकल्प अहवालावर(डीपीआर) आधारलेला असणार आहे. पालिका प्रशासनाने चालू महिन्याच्या सुरुवातीलाच डीपीआरसंदर्भात स्वारस्य दाखवले. त्यानंतर पालिकेच्या आवाहनाला जवळपास १२ कंपन्यांनी प्रतिसाद दिला. या प्रकल्पाच्या निविदा पुढील पंधरवड्यात जारी केल्या जाण्याची शक्यता आहे. 'आमच्याकडे अंडर-सी टनेल्सबाबत तपशीलवार अहवाल नाही. डीपीआर आढाव्यासाठी कंपनीची नियुक्ती करण्यामुळे आम्हाला अंडर-सी टनेल्सच्या बांधकामाची कल्पना येईल. याकामी जवळपास ६00 कोटींचा खर्च येणार असून तो कोस्टल रोड प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ५ टक्के आहे.