विधान परिषदेत झाले ६१ तासांचे काम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विधान परिषदेत झाले ६१ तासांचे काम

Share This
मुंबई : राज्य विधान परिषदेमध्ये शुक्रवारी संपलेल्या पावसाळी अधिवेशनात १४ बैठका झाल्या व त्यात ६१ तास २३ मिनिटे कामकाज झाले. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ही माहिती दिली. 


या काळात मंत्री उपस्थित नसल्यामुळे एक तास तर इतर कारणांमुळे आठ तास २८ मिनिटांचे कामकाज झाले नाही. रोज सरासरी चार तास २३ मिनिटे कामकाज झाले. या अधिवेशनात १३0७ तारांकित प्रश्न स्वीकृत झाले. त्यातील ४४ प्रश्नांना तोंडी उत्तरे देण्यात आली. नियम ९३ च्या ५४ स्वीकृत सूचनांपैकी २७ सूचनांवर निवेदने झाली. मान्य झालेल्या २५२ लक्षवेधी सूचनांपैकी ४८ सूचनांवर चर्चा झाली. औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे ३३ सूचना मांडण्यात आल्या. विशेष उल्लेखाद्वारे ५३ सूचना देण्यात आल्या. मान्य झालेल्या चार अल्पकालीन सूचनेपैकी एका सूचनेवर चर्चा झाली. नियम ४६ अन्वये २४ तसेच नियम ४७ अन्वये एक निवेदन करण्यात आले, असेही सभापतींनी जाहीर केले. विधानसभेने मंजूर केलेली १६ तर विधान परिषदेत आलेली तीन विधेयके मंजूर करण्यात आली. तीन अशासकीय स्वीकृत सूचनांपैकी एकाही अशासकीय विधेयकावर तसेच कोणत्याही अशासकीय प्रस्तावावर चर्चा झाली नाही. एकही अर्धा तास चर्चा झाली नाही. ८४ सूचना मान्य करण्यात आल्या होत्या. अंतीम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली, असेही नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages