रेल्वेचे सुरक्षा कवच भक्कम करण्यासाठी आरपीएफमध्ये अतिरिक्त १२00 जवान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वेचे सुरक्षा कवच भक्कम करण्यासाठी आरपीएफमध्ये अतिरिक्त १२00 जवान

Share This
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. रेल्वे प्रशासनाने संपूर्ण देशभरातील सर्वच स्थानकांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी पाऊल टाकले आहे. त्याअंतर्गत पश्‍चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे पोलीस बलाच्या(आरपीएफ) ताफ्यात अतिरिक्त १ हजारहून अधिक जवानांची नियुक्ती केली जाणार आहे. आरपीएफचे मनुष्यबळ वाढणार असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता दूर होईल, असे बोलले जात आहे.

मुंबईच्या उपनगरी मार्गावर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेला धक्का देणार्‍या घटना घडू लागल्या आहेत. अतिरिक्त जवानांच्या नियुक्तीमुळे या घटनांना आळा बसेल, अशी चिन्हे आहेत. रेल्वे प्रशासनाने मुंबईसह संपूर्ण देशभरातील रेल्वे स्थानकांची सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याच्या दृष्टीने हे पाऊल टाकले आहे. याअंतर्गत संपूर्ण देशभरात १७ हजारहून अधिक जवानांची भर पडणार आहे. मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर ६00 नव्या जवानांची नियुक्ती केली जाणार आहे. सद्यस्थितीत मध्य रेल्वेवर आरपीएफचे जवळपास १६00 जवान आहेत. या मार्गावर जवळपास ८00 जवानांची कमी आहे. नव्या जवानांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते लवकरच आरपीएफमध्ये रुजू होतील, असे मध्य रेल्वे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. अतिरिक्त आरपीएफ जवानांना ट्रॅक, रेल्वे यार्ड आणि लोकल गाड्यांबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तैनात केले जाणार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages