रेल्वे प्रवाश्यांसाठी बुरे दिन - जलद आणि धीम्या मार्गासाठी वेगवेगळे तिकीट दर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे प्रवाश्यांसाठी बुरे दिन - जलद आणि धीम्या मार्गासाठी वेगवेगळे तिकीट दर

Share This

मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेनंतर उपनगरीय लोकल विकासासाठी स्थापन झालेल्या मुंबई रेल्वे विकास महामंडळाने नुकतीच श्‍वेतपत्रिका काढली आहे. यामध्ये रेल्वेच्या समस्यांचा आढाव घेण्यात आला असून, जलद आणि धीम्या मार्गावरील लोकलसाठी वेगवेगळे तिकीट दर आकारण्यात यावे, असे नमूद केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये जलद लोकल आणि धीम्या लोकलचे तिकीट दर वेगवेगळे असण्याची शक्यता आहे. यामुळे पश्‍चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे ७५ लाख प्रवाश्यांना याचा फटका बसणार आहे. प्रधानमंत्र्यांनी अच्छे दिनची स्वप्ने दाखवली असली तरी प्रवाश्यांना मात्र बुरे दिन समोर दिसू लागले आहेत. 

उपनगरीय रेल्वेच्या विकासासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाची (एमआरव्हीसी) स्थापना करण्यात आली आहे. एमआरव्हीसीतर्फे उपनगरीय लोकलविषयी एक श्‍वेतपत्रिका क ाढण्यात आली आहे. त्यामध्ये लोकल गाड्यांचे तिकीट दर सर्व्हिसच्या आधारे ठरवण्यात यावे, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच उपनगरीय रेल्वे टॅरिफ अँथॉरिटीची स्थापना करण्यात यावी यावर भर देण्यात आला आहे. उपनगरीय लोकलची आर्थिक स्थिती दर्शवणार्‍या चॅप्टरमध्ये २0१३-१४ मध्ये लोकल गाड्या चालवण्यासाठी ११११ करोड ८0 लाख रुपये खर्च झाले आहेत. तर २0१४-१५ साठी हा आकडा १४00 करोडच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. 

उपनगरीय रेल्वे मार्गावरील पश्‍चिम, मध्य, हार्बर मार्गावर दररोज २९२३ लोकल गाड्या चालवण्यात येतात. मध्य रेल्वेच्या मेन लाईन, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर १६१८ गाड्या तर पश्‍चिम रेल्वेमार्गावर १३0५ गाड्या चालवण्यात येतात. मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईनवर २४१ तर ट्रान्स हार्बर मार्गावर ४ आणि पश्‍चिम रेल्वेमार्गावर ४६६ जलद लोकल चालवण्यात येतात.मुंबईकरांसाठी वेळ आणि चांगली सर्व्हिस महत्त्वाची असल्यामुळे जादा तिकीट देण्यासाठी नकार नसला तरी लोकलची जलद सेवा ही जलदच असेल काय, असा प्रश्न मात्र मुंबईकरांना पडला आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये जलद आणि धीम्या लोकलसाठी वेगवेगळे तिकीट दर रेल्वे प्रशासनाकडून आकारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages