एसटी ५00 शिवनेरी भाडेतत्त्वावर घेणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एसटी ५00 शिवनेरी भाडेतत्त्वावर घेणार

Share This

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या शिवनेरी गाड्या राज्यातील इतर मार्गावरही धावणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) शिवनेरी श्रेणीतील सुमारे ५00 गाड्या भाडे तत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव आखला आहे. १0 ऑगस्ट रोजी झालेल्या महामंडळाच्या बैठकीमध्ये तसा प्रस्ताव मांडण्यात आला असून लवकरच त्याबाबतचे सर्वेक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर निविदा प्रक्रियेद्वारे या ५00 गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. तसेच मुंबई-पुणे या मार्गावर सोबतच राज्यातील इतर महत्त्वाच्या मार्गावरही त्या चालवण्यात येणार आहेत.
एसटीची शिवनेरी सेवा प्रामुख्याने दादर-पुणे, ठाणे-पुणे, पुणे-औरंगाबाद आणि पुणे-नाशिक या मार्गावर चालवण्यात येते. एसटीच्या विस्तारीकरणाच्या आराखड्यामध्ये ही सेवा राज्यभरात इतर ठिकाणीही चालवण्याचा महामंडळाचा विचार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद-नागपूर, पुणे-नागपूर, नाशिक-मुंबई, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर या काही महत्त्वाच्या मार्गावर चालवण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाच्या १0 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये ५00 शिवनेरी श्रेणीच्या बसगाड्या भाड्याने घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने त्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती एसटीमधील एका अधिकार्‍याने दिली. 

७0 नव्या एसी गाड्या येणार एसटी महामंडळाने ७0 नव्या एसी गाड्या विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. व्होल्वो आणि स्कॅनिया कंपनीच्या नव्या गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांचा प्रवास आरामदायक होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages