फुकट्या प्रवाशांकडून ६ कोटी दंड वसूल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फुकट्या प्रवाशांकडून ६ कोटी दंड वसूल

Share This
मुंबई : पश्‍चिम रेल्वेवर जुलै महिन्यात एक लाख ७१ हजार फुकट्या प्रवाशांकडून ६ कोटी ४५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी १२.६८ने अधिक आहे. जुलै महिन्यात परेवर केलेल्या कारवाईत फुकट्या प्रवाशांप्रमाणेच अनधिकृत फेरीवाले, भिकारी, दुसर्‍यांच्या नावावर प्रवास करणार्‍यांचाही समावेश आहे. अन्य प्रवाशांच्या नावावर प्रवास करणार्‍या ५२ प्रवाशांकडून ४६ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर १२८९ भिकारी आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. त्यातून सुमारे १ लाख ३0 हजारांचा दंड वसूल करण्यात आला असून ८७ जणांना तुरुंगात धाडण्यात आले. या काळात दलालांविरोधात १९५ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून त्यात २२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages