निर्भया कोषातून २0 हजार रेल्वे डब्यांत सीसीटीव्ही बसविणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

निर्भया कोषातून २0 हजार रेल्वे डब्यांत सीसीटीव्ही बसविणार

Share This
नवी दिल्ली : रेल्वेमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वे निर्भया कोषातून ७00 कोटी रुपये खचरून २0 हजार डब्यांमध्ये निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे. त्यासाठीच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. 

रेल्वे अधिकार्‍याने सांगितले की, पंतप्रधान कार्यालयात नुकतीच एक बैठक संपन्न झाली असून, यावेळी नवे रेल्वेमार्ग तयार करणे, रेल्वे ओव्हरब्रीज निर्मिती, प्रवासी सुविधा उत्तम करणे आणि सुरक्षेसह काही योजनांना गतिमान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश रेल्वेमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची योजना आहे. आतापर्यंत काही रेल्वेंमध्येच निगराणीसाठी कॅमेरे आहेत. त्यात काही उपनगरीय सेवांचा समावेश आहे. बैठकीत हजर राहिलेल्या अधिकार्‍याने पुढे म्हटले की, प्रस्तुत योजनेनुसार, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास प्राथमिकता देण्यात येणार आहे.

या उद्दिष्टपूर्तीसाठी निर्भया कोषातून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे महिला व बालकल्याण विकास मंत्रालय समन्वय साधत आहे. डिसेंबर २0१२ मध्ये राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर सुरक्षा निधी म्हणून २0१३ साली निर्भया कोषाची स्थापना करण्यात आली. या कोषात ३000 कोटींचा निधी आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages