शहरी मुले १४ व्या वर्षीच पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवतात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शहरी मुले १४ व्या वर्षीच पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवतात

Share This
शहरी मुलांमध्ये लैंगिक संबंधांचे वाढते आकर्षण असल्याची वस्तुस्थिती उजेडात आली आहे. शहरी भागातील मुले वयाच्या १४व्या वर्षीच पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवत असल्याचे एका सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे. या निष्कर्षामुळे शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाचे धडे देण्याची निकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

अल्पवयीन मुलांमध्ये लैंगिक आजारांचे प्रमाण वाढल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मागील ४ वर्षांत अल्पवयीन मुलांमधील लैंगिक आजारांचे प्रमाण ४.९ टक्क्यांनी वाढल्याचे उघड झाले आहे. देशभरातील ८ महानगरे व १२ शहरांमधील १३ ते १९ वर्षे या वयोगटातील १५ हजार मुलांना सर्वेक्षणात सामील करून घेण्यात आले होते. एका संस्थेने केलेल्या या सर्वेक्षणादरम्यान ८.९ टक्के मुलांनी 'सेक्श्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन' झाल्याची कबुली दिली. मुलांनी सरासरी वयाच्या १३व्या वर्षी तर मुलींनी १४व्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवल्याचे मान्य केले. अल्पवयीन मुला-मुलींमध्ये लैंगिक आजारांचा वाढता टक्का ही चिंताजनक बाब असल्याचे जाणकारांचे मत आहे. ५७ टक्के मुला-मुलींनी लैंगिक संबंधांविषयीची माहिती इंटरनेटवरून जाणून घेतल्याचे सर्वेक्षणकर्त्यांना सांगितले. भारतात लैंगिक संबंधाविषयी कमालीचा न्यूनगंड असून अल्पवयीन मुलांना याबाबत योग्य पद्धतीने माहिती देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लैंगिक संबंध ठेवण्याचे वय १४ वर्षांपर्यंत खाली येणे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्र आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages