अग्निशमन यंत्रणेबाबत प्रपत्र 'बी' न दिल्यास ५0 हजार रुपये दंड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अग्निशमन यंत्रणेबाबत प्रपत्र 'बी' न दिल्यास ५0 हजार रुपये दंड

Share This
मुंबई : इमारतींमधील आगीच्या घटना रोखण्यासाठी अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवून त्यांची तपासणी परवानाधारक एजन्सीकडून करावी आणि ती यंत्रणा तपासल्याचे प्रपत्र 'बी' ऑनलाइन अपलोड करावे, असे अग्निशमन दलाने सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांना, भोगवटाधारकांना आणि पालकांना बंधनकारक केले आहे. हे प्रपत्र जानेवारी आणि जुलैमध्ये सादर न केल्यास ५0 हजार रुपये दंड अथवा सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असा इशारा पालिकेने दिला आहे. 

लोटस पार्क, काळबादेवी, पवई लेक होम आदी ठिकाणी आग लागल्याने मोठी जीवितहानी आणि वित्त हानी झाली होती. या घटनांनंतर अग्निशमन दलाने इमारतींना लागणार्‍या आगी रोखण्यासाठी परिपत्रक काढून इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणांची नियमित तपासणी करणे बंधनकारक केले आहे. हे प्रपत्र जानेवारी आणि जुलैत पालिकेच्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक असून हा अर्ज पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुंबईतील गृहसंकुले आणि इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणांची तपासणी करण्यासाठी अग्निशमन दलाने ३७२ एजन्सीना परवाने दिले आहेत. यंत्रणा न तपासणार्‍यांना महाराष्ट्र अग्नि प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २00६ अन्वये नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यानंतर शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages