पालिकेच्या एस विभागातील लाचखोर अधिकाऱ्यांना पकडून दिल्याचा तक्रारदारावर राग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या एस विभागातील लाचखोर अधिकाऱ्यांना पकडून दिल्याचा तक्रारदारावर राग

Share This
तक्रारदाराला घर सोडून जाण्याच्या, खोट्या केसेस दाखल करण्याच्या धमक्या 
मुंबई / अजेयकुमार जाधव / 

SATURDAY, AUGUST 29, 2015

मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागातील अधिकाऱ्यांनी रामदुलार पाल यांच्या बांधकामाला नोटीस बजावून बांधकामाला दिलेली नोटीस रद्द करण्यासाठी तसेच तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यासाठी लाच मागितली होती. सदर तक्रार व नोटीस रद्द करण्यासाठी कनिष्ठ अभियंता व तक्रारदारालाने पाल यांच्याकडून लाच मागितली होती. पाल यांनी कनिष्ठ अभियंता व तक्रारदाराला लाच लुचपत विभागाकडून पकडून दिले होते. पालिकेच्या अधिकाऱ्याला आणि तक्रारदाराला लाच घेताना पकडून दिल्याचा राग मनात ठेवून भांडुपच्या एस विभागाकडून राहत असलेली जागा सोडून जाण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून धमकावले जात असल्याची तक्रार पाल यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे.

रामदुलार पाल हे भांडुपच्या तुळशेतपाडा येथे राहतात. ते राहत असलेली जागा १६ सप्टेंबर १९७६ साली महाराष्ट्र शासनाने गलिच्छ वस्ती म्हणून जाहिरी केली आहे. रामदुलार पाल यांच्याकडे ते राहत असलेल्या जागेवरील १९९४ पूर्वीचे पुरावे आहेत. या वस्तीमधील इतर रहिवाश्यांनी येथील स्थानिक गुंड आणि पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ३० फुटाची घरे बांधली आहेत. पाल यांनीही आपले घर पालिका अधिकारी आणि स्तःनिक गुंडाला भिक न घालता १९ फुटाचे केले. याची तक्रार पालिकेकडून तक्रार आणि पालिकेने पाल यांच्या बांधकामाला तोडण्याची नोटीस रद्द करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. लाच मागणाऱ्या विरोधात लाच लुचपत विभागात तक्रार केल्यावर १० हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना कनिष्ठ अभियंता योगेश पंडित व तक्रारदार दलाल राम्सुरात यादव यांना २५ जुलै २०१५ रोजी अटक केली आहे. 

पालिकेकडे तक्रार करून नंतर त्या अनुषंगाने हफ्ते वसूल करणाऱ्या पालिकेच्या कनिष्ठ अभियंता व तक्रारदाराला लाच लुचपत खात्याने पकडल्याने एस विभागातील अधिकाऱ्यांनी पाल यांच्यावर राग काढण्यास सुरुवात केला आहे. ते राहत असलेले घर पालिकेने तोडले आहे. नियमानुसार १४ फुटाचे घर बांधण्यास परवानगी असताना त्या उंचीचे घरही पाल यान बांधण्यास दिले जात नाही. जर घर बांधायला सुरुवात केल्यास एमपीडीए कायद्याखाली गुन्हे दाखल करण्याची तसेच हे राहते घर सोडून जा नाहीतर स्थानिक गुंड रुल मारून ताक्रील अशी धमकी पालिका अधिकारी देत असल्याची तक्रार पाल यांनी आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. एस विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कृपेने पावसाळ्यात आम्ही पालिकेने पाडलेल्या घरात राहत आहोत. आयुक्तांकडे तक्रार केल्यावर आयुक्तांनी याच भ्रष्ट आणि धमक्या देणाऱ्या अधिकाऱ्यांकडे आम्हाला न्याय देण्यासाठी आमची तक्रार पाठवली असल्याने आम्हाला न्याय मिळणार नसल्याने आयुक्त अजोय मेहता यांनीच घर बांधायला परवानगी द्यावी अशी मागणी पाल यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages