कोस्टल रोडसंबंधी ७५0हून अधिक हरकती सूचना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोस्टल रोडसंबंधी ७५0हून अधिक हरकती सूचना

Share This

मुंबई : मुंबई महापालिकेच्या बहुचर्चित कोस्टल रोडसाठी गेल्या महिनाभरात तब्बल ७७९ हरकती आणि सूचना आल्या असून, त्यांचा अभ्यास केल्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू होईल. या रोडसंबंधीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महापालिकेने प्रसिद्ध केल्यानंतर गेल्या महिन्यात २७ जुलैपर्यंत १६३ हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. मात्र मुंबईकरांना आणखी मते नोंदवता यावीत यासाठी प्रशासनाने ही मुदत आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आली. त्याची मुदत संपल्यानंतर छाननी केल्यावर २७ जुलै ते २७ ऑगस्ट या कालावधीत ७७९ हरकती आणि सूचना आल्याचे आढळले. या हरकती आणि सूचनांचा अभ्यास आणि वर्गीकरण करून त्याबद्दल संबंधितांचे निरसन करण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages