सार्वजनिक जीवनात वावरताना मंत्र्यांनी भान ठेवावे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सार्वजनिक जीवनात वावरताना मंत्र्यांनी भान ठेवावे

Share This

राज्य दुष्काळाच्या छायेत असताना जलसंपदा मंत्र्यांची कुम्भ मेळा शाही स्नान मध्ये जलक्रिडा खेदजनक
सचिन अहिर यांची टीका
मुंबई: ३० ऑगस्ट
राज्याचा अन्नदाता अवर्षणामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेला असताना त्याचे दु:ख दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मंत्री शाही स्नानसोहळे मध्ये जल क्रीड़ा व मस्ती करण्यात मग्न आहेत. सार्वजनिक जीवनात वावरताना मंत्र्यांनी भान ठेवावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मा. श्री. सचिन अहिर यांनी केली. नाशिकच्या कुंभ मेळ्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची शाही स्नानादरम्यान आपल्या मित्र परिवारासोबत केलेली जलक्रिडा म्हणजे मंत्र्यांच्या असंवेदनशीलतेचा कळस असल्याचेही सचिन अहिर म्हणाले.


सध्या राज्यातल्या बहुतांश भागात अवर्षणामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. त्यातच अपुऱ्या पावसामुळे संपुर्ण राज्यावर पाणी टंचाईचे संकटही येऊ घातले आहे. मुख्यमंत्री आणि इतर नेते दुष्काळी भागांच्या दौऱ्यावर आहेत. अशा वेळी प्रसिद्धीमाध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर शाहीस्नानादरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सुरू असलेला धिंगाणा मन विषण्ण करून गेल्याची प्रतिक्रिया अहिर यांनी दिली. कुंभ मेळा आणि त्यातील शाही स्नान ही दशकातून एकदा येणारी संधी अाहे हे मान्य आहे. मंत्रिमहोदय राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यात सामिल झालेत ही बाबही मान्य आहे. मात्र त्यामागचा धार्मिक भाव जपत त्यात सामिल होण्याऐवजी मंत्रिमहोदयांनी जी जलक्रिडा आपल्या मित्रमंडळींबरोबर सुरू केली होती, ते वृत्तवाहिन्यांवरून पाहताना खेद वाटला. सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्या वागणुकीद्वारे अप्रत्यक्षरित्या काेणता संदेश जनसामान्यांपर्यंत जातो याचे भाग बाळगणे आवश्यक आहे, असा सल्लाही अहिर यांनी महाजन यांना दिला. भविष्यात या गोष्टीचे भान मंत्रिमहोदय ठेवतील अशी आशा वाटते असेही अहिर म्हणाले.‎

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages