मुंबईकराना पालिकेच्या कामकाजाची माहितीच नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईकराना पालिकेच्या कामकाजाची माहितीच नाही

Share This
माहिती नागरीकापर्यंत नेण्यास पालिका अपयशी
मुंबई : ६0 टक्के मुंबईकरांना आपण राहत असलेल्या 'वॉर्ड'चे नावच माहिती नाही, पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पाची फक्त ३५ टक्के मुंबईकरांनी दखल घेतली, 'निर्भया कौन्सिलिंग सेंटर्स'बद्दल अवघ्या २५ टक्के मुंबईकरांना माहिती, फक्त ३४ टक्के मुंबईकर पालिकेच्या रुग्णालयांच्या विविध सेवा घेतात. त्यापैकी १६ टक्के ही सेवा असमाधानकारक आणि १८ टक्के मुंबईकरांचे याविषयी वाईट मत आहे तर ५६ टक्के मुंबईकरांना पालिकेची 'वेबसाईट' आहे हेही माहिती नाही. ही धक्कादायक आकडेवारी सेंट झेवियर्स महाविद्यालयातील १0 विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वेक्षणात मांडली आहे. एकूण १३ प्रश्नावली होती. मात्र, हा सर्व्हे फक्त पश्‍चिम उपनगरांतच करण्यात आला.
मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत पालिका गणली जाते. या पालिकेकडून असंख्य सेवासुविधा मुंबईकरांना, येथे कामानिमित्त येणार्‍यांना, विद्यार्थ्यांना आणि समाजातील विविध घटकांना दिल्या जातात; पण येथील मूळच्या रहिवाशांना म्हणजेच, मुंबईकरांना पालिकेबद्दल, या संस्थेकडून दिल्या जाणार्‍या विविध सेवा-सुविधांविषयी काय माहिती आहे, या शहराबद्दल काय ज्ञान हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक प्रा. अवकाश जाधव यांनी 'सेंट झेवियर्स'मधील १0 विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वेक्षण केले. यात दोन हजार मुंबईकरांचा 'सर्व्हे' केला. प्रत्येक विद्यार्थ्याने सुमारे २00 प्रश्न विचारले होते, ही प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण झाली. मात्र, असंख्य मुंबईकरांना आपल्या हक्कांविषयी काहीच माहिती नसल्याचे वास्तव या सर्वेक्षणात पुढे आले आहे. पालिकेचा लोकांवर सामाजिक परिणाम काय होतो, हे जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे घेण्यात आला. केतकी म्हात्रे, श्रेया ठाकर, कार्ल अँरॉन, रोचना कम्मोवानी, चेतन कोकरे, श्रुती नारकर, नित्या थॉमस, सलोनी पवार, समुद्रनील रॉय आणि तियारा प्रसाद या विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता.


अहवालातील बाबी  - 
५६ टक्के पालिकेच्या 'वेबसाईट'बद्दल अजाण 'सेंट झेवियर्स' महाविद्यालयाचे सर्वेक्षण? पालिकेच्या ४00 शाळांत व्हच्यरुअल क्लासरूम सुविधा आहे, याची ८१ टक्के लोकांना माहिती नाही.

६२ टक्के मुंबईकर आपल्या पाल्यांना पालिके च्या शाळांत दाखल करण्यास अनुत्सुक आहेत.

पालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन कक्षाचा हेल्पलाइन क्रमांक ७४ टक्के मुंबईकरांना माहितीच नाही. हा कक्ष आणखी कर्तव्यदक्ष करण्याची गरज ८५ टक्के मुंबईकरांनी व्यक्त केली.

पाण्याचा अतिवापर करणार्‍यांवर अतिरिक्त कर लादावा, असे मत ६९/५ टक्के मुंबईकरांनी व्यक्त केले.

९१ टक्के मुंबईकरांना पालिकेचे नागरी सुविधाविषयक 'अँप' आहे, हेपण माहिती नाही.

३५ टक्के मुंबईकरांचा पालिकेच्या अधिकार्‍यांशी कधीच संपर्क झाला नसून ३३ टक्के मुंबईकर अधिकार्‍यांशी झालेल्या संवादाबद्दल सरासरी समाधानी आहेत तर अवघ्या दोन टक्के जणांना हे संभाषण 'उत्तम' वाटले असून नऊ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages