स्वाईन फ्लूने मुंबईत ऑगस्टमध्ये 17 जण दगावले - 651 रुग्ण दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वाईन फ्लूने मुंबईत ऑगस्टमध्ये 17 जण दगावले - 651 रुग्ण दाखल

Share This
मुंबई 30 August 2015 ( प्रतिनिधी ) - 
स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढू लागल्याने मुंबईत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये या महिन्यात या रोगाचे 651 रुग्ण दाखल झाले असून 17 जण दगावले असल्याची धक्कादायक माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली आहे. रोग आटोक्‍यात आणण्यासाठी पालिकेचे आरोग्य खाते सतर्क झाले आहे. पालिकेने आतापर्यंत 75 हजार 284 रुग्णांचे सर्वेक्षण करून प्रभावी उपाययोजना केल्या आहेत.

गेल्या जानेवारी पासून आतापर्यंत मुंबईत स्वाईन फ्ल्यूचे 2 हजार 680 रुग्ण पालिकेच्या रुग्णालयांध्ये दाखल झाले असून 40 जणांचा मृत्यू झाला.पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये तसेच छोट्या दखाखान्यांमध्ये या आजाराचे सर्वेक्षण केले जात आहे. बाधीत रुग्ण आढळल्यास त्या परिसराचेही सर्वेक्षण केले जाते. पालिकेच्या केईएम, सायन आणि नायर या तीन प्रमुख रुग्णालयांध्ये तसेच सर्वसाधारण रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या


रुग्णांसाठीच्या खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच व्हेंटीलेटरची संख्याही वाढविली आहे. मास्क, सर्जिकल मास्क तसेच अत्यावश्‍यक उपकरणांचा साठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुंबईत पीसीआर लॅल, कस्तूरबा रुग्णालय आणि हाफकीन येथे तपासणी प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. तसेच अन्य आठ खासगी लॅबही आत उपलब्ध झाल्या आहेत. राज्य शासनाने पुरेशी औषधे पालिकेला पुरविली आहेत. हा रोग अटोक्‍यात आणण्यासाठी 1 हजार 366 वैद्यकीय अधिकारी, 4 हजार 600 खासगी वैद्यकीय व्यवसायिक आणि 230 डॉक्‍टर्स तैनात केले आहेत. विविध उपायोजना सुरू असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages