रर-त्यांवरील खड्डे बुजवण्याची डेड लाईन संपली तरी खड्डे बुजेनात - आयुक्तांचे आदेश धाब्यावर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रर-त्यांवरील खड्डे बुजवण्याची डेड लाईन संपली तरी खड्डे बुजेनात - आयुक्तांचे आदेश धाब्यावर

Share This
पालिकेच्या कागदावर अजून 156 खड्डे
मुंबई 30 AUGUST 2015  ( प्रतिनिधी ) -
गणरायाच्या मूर्तीचे आगमन होणार असल्याने 29 ऑगस्टच्या आत मुंबईच्या सर्व रस्त्यांमधील खड्डे बुजवा असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. डेडलाईन संपली तरी त्यांच्या  आदेशाचे अजूनही पालन झालेले नाही. रस्त्यांतील खड्डे बुजलेले नाहीत. गणरायाच्या मार्गात अजूनही खड्ड्यांचे विध्न सरलेले नाही . त्यामुळे गणेश भक्तांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे पालिकेच्या रेकॉर्डवर अजूनही 156 खड्डे शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


गणेशोत्सव समन्वय समितीसोबत झालेल्या संयुक्त बैठकीत गेल्या पंधरा दिवसापूर्वी शहर आणि उपनगरातील खड्डे बुजविण्याचा शब्द पालिका आयुक्त मेहता यांनी दिला होता. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत पंधरा दिवसात रस्त्यांतील सर्व खड्डे बुजविण्याचे आदेशही दिले होते. मात्र त्या
आदेशांचे पालन झालेले दिसत नाही. पावसाने उघडीप घेतल्याने रस्त्यांच्या  दुरूस्तीसाठी चांगले वातावरण मिळाले होते. मात्र अजूनही अनेक रस्त्यांवर खड्डे तसेच आहेत. काही जंक्‍शनवर खड्डांना मलमपट्टी केल्याचे दिसून येत आहे. अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजलेले दिसत नाहीत. गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसाच्या सरींनी खड्डे पुन्हा उखडले असल्याचे दिसून येत आहे. पुन्हा काही रस्ते खड्डेमय झाल्याचे दिसत आहे. दगडमाती टाकू  अनेक ठिकाणी खड्डे बुजविल्याचे दिसत आहे. त्यामुळे खड्ड्यांमुळे रस्ते  चिखलाने माखले आहेत. डांबर आणि खड्डी टाकून खड्डे बुजविले जात आहेत. त्याने रस्त्याच्या पृष्टभागाचा चढउतार होत असल्याने वाहतूकीला त्रासदायक ठरू लागले आहे. त्यावरून येणाऱ्या गणपतीच्या मूर्तींना हादरे बसत आहेत  परिणामी मूर्तींना सुरक्षित आणण्याशिवाय पर्याय नसल्याचे गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आयुक्तांनी दिलेली डेड लाईन टळली तरीही संपूर्ण खड्डे बुजविण्यात पालिकेला यश आलेले नाही. 156 खड्डे अजूनही रेकॉर्डवर शिल्लक असल्याचे समजते.


64 कोटींचे खड्डेयंदा रस्त्यातील खड्ड्यांसाठी 64 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर मध्ये झालेली उघडीप पुन्हा पावसाच्या सरी असा पावसाचा लपंडाव सुरू राहिल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली. अजूनही पावसाचे दिवस संपलेले नाहीत. त्यामुळे यंदाच्या खडड्यांच्या खर्चात वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages