> मुंबईमधे नागरिकांना 20 टक्के तर व्यावसायिकाना 50 टक्के पाणी कपात लागू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

> मुंबईमधे नागरिकांना 20 टक्के तर व्यावसायिकाना 50 टक्के पाणी कपात लागू

Share This
मुंबई / प्रतिनिधी / 26 August
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या  तलावामधे पाणी साठा कमी राहिला आहे. बुधवारी स्थायी समिती बैठकीत नागरिकांना 20 टक्के तर व्यावसायीकाना 50 टक्के पाणी कपात करत असल्याची घोषणा करण्यात आली.


मुंबईला दरवर्षी 14 लाख 50 हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. या वर्षी ऑगस्ट महीना संपत आला तरी 26 ऑगस्टरोजी सर्व तलावामधे 9 लाख 62 हजार 338 दशलक्ष लिटर इतका पाणी साठा उपलब्ध आहे. चालू वर्षी तलावा मधे 28 टक्के पाणीसाठा कमी असून उपलब्ध पाणी साठा मुंबईकर नागरिकांना 260 दिवस पुरेल इतकाच आहे. पाण्याचा साठा कमी असल्याने पालिका प्रशासनाने सामान्य नागरिकांना 20 टक्के तर व्यावसायिकाना 50 टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांनी स्थायी समितीत निवेदन केले असता स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी या पाणी कपातीला मंजूरी दिली.

पालिकेने स्थायी समितीपुढे सादर केलल्या प्रस्तवानुसार निवासी औद्योगीक व व्यापारी जलजोडणी धारकाना 20 टक्के पाणी कपात तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करणारे जलतरण तलाव, माँल्स, वातानाकुलीत सयंत्रे, बाटली बंद पाणी, शीतपेय कारखाने, तारांकित होटेल, रेसकोर्स इत्यादी ठिकाणी 100 मिमी पेक्षा जास्त आकाराच्या जलजोडण्या असलेल्याना 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे.

मुंबईमधे पाणी कपात जाहिर करताना मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे तसेच भिवंडी येथील महानगरपालिका व नगरपलिकेचा पाणी पुरवठा 20 टक्के कमी केला जाणार आहे. धरणामधे जमा होणाऱ्या पाण्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. धरणामधील पाणी साठा कमी झाल्यास पाणी कपातीत वाढ केली जाणार आहे. मुंबईमधे 41 हजार 470 ठिकाणी पाणी गळती होती त्यापैकी 41 हजार 426 ठिकाणची गळती रोखण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिली.

तलावाचे नाव    26 ऑगस्ट   26ऑगस्ट    26 ऑगस्ट
                           2013          2014            2015

मोडकसागर      128925     127056       115756        
तानसा              144240     143593       112847
विहार                  27698       26785         11425
तुळशी                   8046          8046          7609            
अप्पर वैतरणा   207760     194854      106359    
भातसा              672591      642706      417152
मध्य वैतरणा      62345       193218     191190
एकूण             1251605     1336258       96233

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages