मुंबई रविवार ( प्रतिनिधी ) - मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हळू हळू जोर धरला आहे. त्यामुळे तलावांमधील पाण्याची पातळीही वाढू लागली आहे. तलाव क्षेत्रातील पावसाचा जोर असाच राहिल्यास मुंबईवरील पाणी संकट टळण्याची शक्यता आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने तलावांच्या पातळीत सुमारे 40 हजार दशलक्ष लिटर इतकी वाढ केल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे.
गुरूवारी निवासी पाण्याच्या पुरवठ्यात वीस टक्के इतकी तर व्यावसायिक वापरासाठीच्या पाण्यात पन्नास टक्के इतकी कपात केली. त्यावेळी मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांमध्ये 263 दिवस पुरेल इतका पाणीसाठी होता. हा पाणीसाठा 9 लाख 32 हजार दशलक्ष लिटर इतका होता. आता हा जलसाठा 9 लाख 83 हजार इतका झाला आहे. साठ्यात 40 हजार दशलक्ष लिटर इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाने मुंबईकरांना चांगलाच दिलासा दिला आहे.
मुंबईला दररोज 3 हजार 700 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करूनही जलसाठ्यात होत असलेली वाढ ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस मुंबईसाठी लाभदायक ठरू लागला आहे. जून आणि जुलै मध्ये पडणारा मुसळधार पाऊस ऑगस्ट सप्टेंबरमध्ये गायब झाल्यास मुंबईवर पाणी संकट निर्माण होते. जलाशयातील पाणीसाठा घटतो. मात्र उशीरा पडणारा पाऊस तलावांतील पाण्याचा साठी सुरक्षित ठेवू लागला आहे. ही समाधानाची बाब असल्याची माहिती जलअभियंता खात्याने दिली आहे.
तुळशी तलाव भरण्याच्या मार्गावरमुंबईला पाणी पुरविणारा तुळशी तलावाची पूर्ण भरण्याची पातळी आहे 139.17 मीटर. सद्या या तलावांतील पाण्याची पातळी 138.96 इतकी झाली आहे. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच राहिल्यास हा तलाव कधीही भरून वाहू शकतो, अशी माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली आहे.