नगरसेवकांवर गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ
मुंबई । अजेयकुमार जाधव
मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक काय कामे करतात, नागारिकांचे किती प्रश्न पालिकेच्या सभामधे विचारतात याचा अहवाल प्रजा या संस्थेने सोमवारी व्यवस्थापकीय ट्रस्टी निताई मेहता व संचालक मिलिंद म्हस्के यांनी प्रसिद्ध केला. या अहवालानुसार सन 2012-13 मधे 81 टक्के असलेली उपस्थिती सन 2014 -15 मधे समिती सभामधील हजेरी कमी होउन 68 टक्यावर आली आहे. 2014-15 मधे 817 सभामधे 2727 प्रश्न विचारण्यात आले. प्रत्तेक बैठकीत विचारलेल्या प्रश्नांची टक्केवारी 3.3 टक्के होती असे मिलिंद म्हस्के यांनी सांगितले
या अहवालानुसार भाजपा 61.03 टक्के मिलवुन पहिल्यास्थानी आहे. समाजवादी पक्ष 59.60 टक्के मिलवुन दुसऱ्या, 59.60 टक्के मिलवुन राष्ट्रवादी पक्ष तिसरया, 59.17 टक्के मिलवुन शिवसेना चौथ्या, 58.41 टक्के मिलवुन कोंग्रेस पाचव्या तर 54.34 टक्के मिलवुन मनसे सहाव्या स्थानावर आहे.
सन 2012 साली निवडून आलेल्या 30 नगरसेवकांवर गुन्हे दाखल होते त्यामधे वाढ होउन ही संख्या 57 वर गेली आहे. नगरसेवकांवर गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात 20 टक्क्यानी वाढ झाली आहे. डिसेंबर 2014 पर्यन्त 30 नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले तर 40 नगरसेवकां विरोधात चार्जशिट दाखल झाले आहेत अशी माहिती म्हस्के यांनी दिली.
2012-13 मधे प्रश्न विचारण्याचे प्रमाण 47 टक्के होते त्यात वाढ होउन 2014-15 मधे हे प्रमाण 51 टक्क्यांवर पोहोचले आहे. माहिती जागरूकता व लोकप्रतिनिधिंची पोहोच 2013-14 मधे 35 टक्के होती 2014-15 मधे ही टक्केवारी 52 टक्क्यांवर गेले असल्याचे निताई मेहता म्हणाले.
