रोड ऐवजी गजबजलेला जावळे रोड आदर्श करा
सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) - :
मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) - :
मुंबईतील २४ वॉर्डातील एक रस्ता आदर्श करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी तसा आदेश प्रत्येक वॉर्डला दिला आहे. त्यानुसार दादर पश्चिमेकडील रानडे रोड आदर्श करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र ही संकल्पना राबवताना या मार्गावर गेल्या ४० ते ४५ वर्षापासून भाजी, फळांचा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना हटवावे लागणार असल्याने त्यांची रोजी रोटी जाणार आहे. त्यामुळे रानडे रोड ऐवजी रेल्वे स्थानका नजीकचा वर्दळीचा जावळे मार्ग आदर्श करावा. याबाबत विचार करण्यासाठी विशेष बैठक बोलावून त्यात योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
शहरात रस्ते अडवणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची धडक मोहीम पालिकेतर्फे सुरु आहे. कारवाईत फक्त फेरीवाल्यांच्या वस्तू जप्त केल्यास, फेरीवाले पुन्हा काही दिवसांनी त्याच जागेवर व्यवसाय लावतात. त्यामुळे कारवाईच्यावेळी त्यांची स्टॉल व इतर सामानही नष्ट करण्यात यावे, असे आदेश आयुक्त मेहता यांचे आहेत. मुंबईतील सर्व वॉर्डातील एक रस्ता आदर्श करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यानुसार दादर पश्चिमेकडील रानडे रोड आदर्श करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाविरोधात येथील जुने फेरीवाल्यांनी या रोडऐवडी जावळे मार्ग आदर्श करा अशी मागणी सभागृहनेत्या विश्वासराव यांच्याकडे केली. विश्वासराव यांनीही राऩडेरोड ऐवजी जावळे रोड आदर्श करावा अशी आयुक्तांकडे मागणी केली आहे. त्याबाबत येत्या आठवडाभरात बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्याचे आयुक्तांनी मान्य केले असल्याचे विश्वासराव यांनी सांगितले.
