मुंबई । अजेयकुमार जाधव
मुंबई उपनगरातील घाटकोपर मुलुंड हायवे आणि घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आली आहेत. हे रस्ते व् सर्व्हिस रोड पिडब्लूडीच्या अखत्यारित येतात. पीडब्लूडीकड़े अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी यंत्रणा नसल्याने पालिकेने ही यंत्रणा पुरवावी अशी सूचना सोमय्या यांनी केली असता. आयुक्तानी याला मंजूरी दिली आहे. ही अनधीकृत बंधकाम पालिका 25-26 ऑगस्टला तोडणार असून पिडब्लूडी या कामावर देखरेख ठेवणार आहे. या दोन्ही रस्त्यावर सर्व्हिस रोड अर्धवट आहेत. कित्तेक ठिकाणी नाल्यावर ब्रिज नसल्याने या रस्त्यांचा वापर करता येत नाही. यामुले अशे ब्रिज बनवण्यासाठी टेंडर काढले जाईल असे आश्वासन दिल्याचे गटनेते मनोज कोटक यानी सांगीतले.
पूर्व उपनगरातील अनाधिकृत बांधकामे निष्कासित करावी तसेच मुलुंड येथील डंपिंग ग्राउंड बंद क़रावे या मागणी एशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमैया यांनी गट नेते मनोज कोटक, सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, शिक्षण समिती अध्यक्षा रितु तावडे यांच्या उपस्थितीत पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली.
मुंबई उपनगरातील घाटकोपर मुलुंड हायवे आणि घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आली आहेत. हे रस्ते व् सर्व्हिस रोड पिडब्लूडीच्या अखत्यारित येतात. पीडब्लूडीकड़े अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी यंत्रणा नसल्याने पालिकेने ही यंत्रणा पुरवावी अशी सूचना सोमय्या यांनी केली असता. आयुक्तानी याला मंजूरी दिली आहे. ही अनधीकृत बंधकाम पालिका 25-26 ऑगस्टला तोडणार असून पिडब्लूडी या कामावर देखरेख ठेवणार आहे. या दोन्ही रस्त्यावर सर्व्हिस रोड अर्धवट आहेत. कित्तेक ठिकाणी नाल्यावर ब्रिज नसल्याने या रस्त्यांचा वापर करता येत नाही. यामुले अशे ब्रिज बनवण्यासाठी टेंडर काढले जाईल असे आश्वासन दिल्याचे गटनेते मनोज कोटक यानी सांगीतले.
मुलुंड येथील डंपिंग ग्राउंड बंद करण्यासाठी केन्द्रीय पर्यावरण विभागाने नोटिस दिली आहे. या नोटिसीप्रमाणे सप्टेम्बर मधे बंद करण्यात येणार आहे. मुलुंड डंपिंगची 4300 टनाची क्षमता कमी करून 2100 टनवर आणण्यात आली आहे. ही क्षमता कमी करण्याचे काम सुरु आहे. मुलुंड डंपिंग बंद झाल्यास कांजुरमार्ग येथील डंपिंगची क्षमता वाढवण्यात येणार आहे. त्या साठी केंद्र सरकार आणि पर्यावरण विभागाच्या परवानग्या मिलवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. मुंबईचा कचरा टाकण्यासाठी तलोजा येथे जागा शासनाने उपलब्ध केली असून त्याच्यासाठी निधी व मंजूरीसाठीचा प्रस्ताव येत्या पालिकेच्या स्थायी समिती पुढे आणण्यात येणार आहे.