रक्षा बंधनासाठी बेस्टच्या जादा गाड्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रक्षा बंधनासाठी बेस्टच्या जादा गाड्या

Share This
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) - ,येत्या शनिवारी रक्षा बंधनासाठी नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणाऱ्या मुंबईकरांच्या सोईसाठी बेस्टने 210 जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.सर्व बस आगारातून शहर आणि उपनगरातील विविध बसमार्गावर एकूण 210 जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या बसगाड्यांचे  प्रवर्तन दुपारी 12.30 पासून दिवसभर चालू राहतील. तसेच प्रवाशांची मोठी गर्दी वाढल्यास आवश्‍यकतेनुसार जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती बेस्टने दिली. बेस्ट प्रशासनाने उपलब्ध केलेल्या जादा बसगाड्यांचा प्रवाशांनी अधिकाधिक वापर करावा असे आवाहनही बेस्टतर्फे करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages