२ सप्टेंबरच्या कामगार संपाला महाराष्ट्र लोकशाही आघाडीचा पाठिंबा - अँड़ प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२ सप्टेंबरच्या कामगार संपाला महाराष्ट्र लोकशाही आघाडीचा पाठिंबा - अँड़ प्रकाश आंबेडकर

Share This
मुंबई : येत्या दोन सप्टेंबरला विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला महाराष्ट्र लोकशाही आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला असून यानिमित्ताने मुंबईत आझाद मैदानावर निषेध सभा घेण्यात येणार आहे. आघाडीचे निमंत्रक व भारिप बहुजन महासंघाचे नेते अँड़ प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत हे जाहीर केले. आघाडीतील घटकपक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण, जनता दल (से.) आदींचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. 

केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल करण्याचे ठरवले आहेत. यानुसार १00 कामगार असलेल्याच नाही तर ३00 कामगारांपर्यंतच्या कारखान्यांना आपले कारखाने बंद करण्यासाठी परवानगी लागणार नाही. ४0 कामगार असलेल्या कारखान्यांना फॅक्टरी अँक्ट लागू होईल. यापूर्वी तो २0 कामगारांच्या कारखान्यांना लागू होता. १९ कामगारांऐवजी आता ४0 कामगारांच्या कारखान्यांची नोंदणी आवश्यक राहील. कामाचे तास दिवसातून आठ तासांऐवजी १२ तास तर तीन महिन्यांत ५0 ऐवजी १00 तास असतील. कंपनीच्या संघटनेचा पदाधिकारी त्या क्षेत्रातील कामगार असणे बंधनकारक राहील तसेच बेकायदेशीर संप करणार्‍या कामगारांना २0 ते ५0 हजार रुपयांपर्यंतचा दंड तसेच एक महिन्याची सजा होणार आहे. या कामगारांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणार्‍या या प्रस्तावित बदलाला विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे, असे ते म्हणाले. या संपाच्याच अनुषंगाने राज्यातील शेतकरी, शेतमजूर तसेच अंगणवाडी सेविकांच्या मानधनाच्या विषयावरही आम्ही त्या दिवशी आंदोलन करणार आहोत. मुंबईत आझाद मैदानावर यानिमित्ताने निषेध सभा घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागातही ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages