कचऱ्याचे डबे गेले कुठे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कचऱ्याचे डबे गेले कुठे

Share This
 मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) - :  मुंबईत काही वॉर्डातील कचरा वेळेवर साफ होत नाहीच, पण तेथे पालिकेचे कचऱ्याचे डबेच गायब आहेत. पालिकेच्या २०१४ च्या जुन्या कंत्राटातील खरेदी केलेले डबे काही ठिकाणी पोहचलेले नाहीत. शिवाय नवीन या वर्षाच्या कंत्राटातील डबेही काही ठिकाणी दिसत नाहीत. नव्या कंत्राटातील डब्यांची प्रतीक्षा आहेच, पण पूर्वीच्या जुन्या कंत्राटातील डबे गेले कुठे? नवीन डब्यांच्या जागी जुनेच डब्यांचे वाटप वॉर्डनिहाय करण्याचे नियोजन आहे की काय? असा सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी स्थायी समितीत विचारला. या कंत्राटात गोलमाल असण्याची शक्यता असल्याने याची चौकशी व्हावी अशी मागणी नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली.

वॉर्डनिहाय काही ठिकाणी डबे गायब आहेत. तर काही ठिकाणी तुटलेल्या जिर्ण डब्यांचाच वापर केला जातो आहे. नवीन डबे उपलब्ध करण्यासाठी पालिकेने २०१४ ला २४० व १२० लिटरचे १४ हजार कचऱ्याचे डबे खरेदी केले. यासाठी सुमारे ४ कोटीचा खर्च आला. निम्म्या ठिकाणी हे डबे पोचले नाहीत. आता २०१५ चे या वर्षासाठी साडेतीन कोटीचे १४ हजार डबे खरेदी करण्यात आले. २०१४ च्या कंत्राटातील एका डब्याची किंमत १८०० रुपये होता. मात्र यंदाच्या कंत्राटात मात्र १५०० रुपये प्रती डब्याची म्हणजे जुन्या कंत्राटातील दरापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आले. दर पूर्वीपेक्षा कमी दराने का खरेदी केले? हे सर्व टक्केवारीसाठी कमी दर लावण्यात आले असल्याचा आरोपही केला जातो आहे. शिवाय जुन्या कंत्राटातील डबे काही ठिकाणी उपलब्धच झाले  नसताना नव्या डब्यांचे कंत्राट काढण्यात आले. अशा तक्रारींकडे  प्रशासनाने लक्ष वेधणे आवश्यक होते. मात्र तसे न करता नवे कंत्राट काढले. आता डब्यांचे वाटप करताना वाटप न करण्यात आलेले जुनेच डबे दिले जाणार आहे का? डब्यांची वाहतूक करताना कंपनीने जकात करही दिला आहे का याची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छे़डा यांनी केली आहे. डब्यांच्या कंत्राटात गोलमाल असण्याला आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय पिसाळ यांनी केला आहे.

Image result for clean up mcgm

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages