कोस्टल रोडसाठी दीड कोटीचा सल्ला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोस्टल रोडसाठी दीड कोटीचा सल्ला

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) -, कोस्टल रोड तयार करण्याची जबाबदारी पालिकेने स्वीकारलीआहे.त्यासाठी पालिका आंतरराष्ट्रीय सल्लागारांची मदत घेणार असून या रोडच्या सल्ल्यासाठी दीड कोटी रुपये पालिका खर्च करणार आहे.मुंबई शहराची वाहतूक वेगवान व्हावी, यासाठी कोस्टल रोड हा महत्त्वांकाक्षी प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. या रोडबाबत सूचना आणि  हरकती आल्या आहेत. रोडच्या निर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय निविदा मागवून सल्लागार नेमले जाणार आहेत. तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून सल्लागार नेमले जातील. समुद्रात भर घालून त्यातून कसा मार्ग काढायचा, मासेमारीवर परिणाम होऊ नये, तेथील स्थानिकांचे रोजगार कसे वाचतील, पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी काय करावे लागेल, याबाबत हे सल्लागार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी दिली. रस्त्यासाठी लवकरच आंतरराष्ट्रीय निविदा मागविल्या जाणार असून कोस्टल रोडच्या कामाला लवकरच वेग येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages