सरकारी योजनेतील धान्याच्या भ्रष्टाचाराचा कळस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सरकारी योजनेतील धान्याच्या भ्रष्टाचाराचा कळस

Share This

शिधावाटप ,मध्यान्ह भोजन योजनेतील धान्यसाठा जप्त
मुंबई / रशिद इनामदार
शिधावाटप अधिकार्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिवा येथील एका खाजगी गोदामावर छापा टाकला.या छाप्यात शिधावाटप तसेच शालेय मध्यान्ह भोजन योजनेतील धान्याचा चोरटा साठा आढळून आला.हा साठा पाहून अधिकारी अवाक झाले.इंडियन लॉजीस्टिक चे हे गोदाम मुळात गोदाम नसून एक खाजगी मिल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


ठाणे जिल्ह्यातील माणकोली येथे इंडियन लॉजीस्टिक  या खाजगी मालवाहतुक संस्थेचे गोदाम आहे.या गोदामामध्ये शिधावाटप योजनेतील धान्याचा चोरटा साठा लपवला असल्याची माहिती अधिकार्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे शिधावाटप अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता. मोठ्या प्रमाणात शिधावाटप तसेच मध्यान्ह भोजनाचा साठा आढळून आला होता.शिधावाटप नियंत्रकांच्या पथकाने सर्व धान्यसाठा व त्याठिकाणी २ माल मोटारी ताब्यात घेतल्या व तपास सुरु केला. याप्रकरणी जयानंद फूड इंडस्ट्रीज या कंपनीचे मालक लखन पटेल आणि त्यांचा व्यवस्थापक मोहम्मद वाफिद खान याच्याविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दोघेही फरार असल्याची माहिती मिळाली आहे. शिधावाटप अधिकाऱ्यांनी मील ला  सील ठोकले आहे. प्रकरणाचा तपास शिधावाटप खात्याचे अधिकारी करणार कि शालेय मध्यान्ह भोजन आहाराशी संबंधित शिक्षण खाते करणार याबद्दल संभ्रम निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे. नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल आकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मिलच्या कर्मचार्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार ४८ टन जास्त धान्यसाठा आढळून आला आहे. त्यामुळे त्या मिलला सील ठोकून फिर्याद नोंदवण्यात आली आहे. शिधावाटप धिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार शालेय मध्यान्ह भोजन योजनेतील तांदुळाच्या २१५ ब्याग्स मिळाल्या आहेत. शिधावाटप नियंत्रक किलारी यांनी नादालकर यांना प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहेत. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून मग ते चौकशीला सुरुवात करतील.

सरकारतर्फे गरिबांना शिधावाटप योजनेंतर्गत धान्य विकले जाते तसेच शालेय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत धान्य दिले जाते. या दोन्ही योजनांचे धान्य चोरून या मिल मध्ये आणण्यात येते. त्यानंतर या धान्याला पोलिश करून बाजारभावाने विक्रीस खुल्या बाजारात आणले जाते. अशा प्रकारचे रॅकेट पूर्ण महाराष्ट्रात तसेच आजूबाजूच्या राज्यात सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिएटिव्ह को ओप सोसायटी लिमिटेड व शक्ती ग्रेन डीलर्स सोसायटी या दोन संस्थेतील हे धान्य होते. दिलीप ठक्कर या व्यापारयाने  धान्यसाठा तो विकत घेऊन आनंद चोपदार या वाह्तुकादाराच्या मदतीने यांना विकला आहे. अशाप्रकारे चोरट्या पद्धतीने गरिबांच्या तोंडचा घास पळवण्याचा हा हीन पहिल्यांदाच झाला नसून काही अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने हे नेहमीच सुरु असते

शिधावाटप खात्याच्या धान्याची चोरी करण्याच्या प्रकरण आळा घालण्यासाठी पथक आहे. जर शालेय मध्यान्ह भोजनाच्या अन्नाच्या बाबतीत असा प्रकार घडल्यास मात्र कोणतेही पथक नसल्याचे मेवाती समाज संस्थेचे अध्यक्ष फारूक मेवाती यांनी सांगितले. तसे पथक निर्माण नाही झाले तर शालेय मध्यान्ह भोजनाचे धान्य चोरून त्यावर व्यापारी अमाप दौलत कमावतील. मात्र शालेय विद्यार्थी या लाभापासून वंचित राहतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages