बुधवारी धारावीत कमी पाणी तर शिवडीत पाणी नाही. - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बुधवारी धारावीत कमी पाणी तर शिवडीत पाणी नाही.

Share This

मुंबई : जलवाहिनी जोडकामामुळे ६ ते ७ ऑगस्टदरम्यान धारावी परिसरात पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे. मरोशी ते रुपारेल दरम्यान ३000 मि.मी. व्यासाच्या भूमिगत जलबोगद्याचे काम पूर्ण झाले असून त्या कामाच्या अनुषंगाने उध्र्व वैतरणा जलवाहिनीवर मरोशी ते सहारदरम्यान सहा ठिकाणी जोड करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

धारावी मुख्य रस्ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. ९0 फुटी रस्ता, संत रोहिदास मार्ग, लूप मार्ग, शास्त्रीनगर, ९0 फुटी रस्ता, शाहूनगर, जस्मीन मिल मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, ट्रान्झिस्ट कॅम्प, संत कैकया मार्ग, शीव-माहिम जोडरस्ता या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. प्रेम नगर, शताब्दी नगर, नाईक नगर, खामदेव नगर, एम. जी. मार्ग, आंध्रा व्हॅली हे भाग पाणीपुरवठय़ाच्या टोकाच्या क्षेत्रात असल्याने या भागात पाणीपुरवठा होणार नाही. धारावी मुख्य रस्ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

शिवडी पश्‍चिम येथील रफी अहमद किडवाई मार्गावर १४५0 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर झडप (व्हॉल्व) बसवण्याचे काम बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी सकाळी १0 पासून ते गुरुवारी, ६ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजेपर्यंत होणार आहे. झडप बसविण्याचे काम पूर्ण होण्यासाठी २४ तास अपेक्षित असल्याने एफ/उत्तर आणि दक्षिण विभागात या वेळेत पाणी पुरवठा होणार नाही. झडप बसविण्याचे काम पूर्ण होण्यासाठी २४ तास अपेक्षित असल्याने एफ/उत्तर आणि दक्षिण विभागात या वेळेत पाणी पुरवठा होणार नाही. शीव, माटुंगा, दादर, पारशी वसाहत, हिंदू वसाहत, दादर टीटी, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग, कात्रक मार्ग, आर. ए. किडवाई मार्ग, सहकार नगर पालिका वसाहत, कोरबा मिठागर, दादर, नायगाव, परळ, लालबाग, चिंचपोकळी, एसएसराव मार्ग, शिवडी पूर्व आणि पश्‍चिम, ज्ञानेश्‍वर नगर, शिवडी पालिका क्षयरोग रुग्णालय, अभ्युदय नगर येथे पाणी मिळणार नाही. परळ व्हिलेज, आंबेवाडी, काळेवाडी येथे कमी दाबाने पाणी मिळणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages