मुंबई, दि. 17
मुंबईला स्मार्ट सिटीचा प्लॅन तयार होत असताना मुंबईच्या महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आज पालिका आयुक्त अजोय महेता यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीची संकल्पना मांडली असून यामध्ये मुंबईचाही समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील स्मार्ट सिटी तयार करण्यासाठी व या योजनेतून जास्तीत जास्त निधी मुंबईला मिळावा तसचे यातून महत्वाचे प्रकल्प मार्गि लागावे यासाठी भाजपाच्या शिष्टमंडळाने आज पालिका आयुक्तांची भेट घेऊन भाजपाची याबाबतची भूमिका आणि मागण्या पालिका आयुक्तांकडे मांडल्या आहेत. यावेळी या शिष्टमंडळाने स्मार्ट सिटी बाबत पालिका तयार करीत अलेला प्लॅन समाजवून घेऊन त्यामध्ये भाजपाने काही मागण्या मांडल्या आहेत. या योजनेतू मुंबईला 1 हजार कोटी रूपये मिळणार असून त्यामध्ये अधिकचा निधीची मागणी पालिकेने केल्यासही ती मिळू शकेल आणि ती मागणी आयुक्त करतील असेही यावेळी आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले.
मुंबईला स्मार्ट सिटीचा प्लॅन तयार होत असताना मुंबईच्या महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आज पालिका आयुक्त अजोय महेता यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीची संकल्पना मांडली असून यामध्ये मुंबईचाही समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील स्मार्ट सिटी तयार करण्यासाठी व या योजनेतून जास्तीत जास्त निधी मुंबईला मिळावा तसचे यातून महत्वाचे प्रकल्प मार्गि लागावे यासाठी भाजपाच्या शिष्टमंडळाने आज पालिका आयुक्तांची भेट घेऊन भाजपाची याबाबतची भूमिका आणि मागण्या पालिका आयुक्तांकडे मांडल्या आहेत. यावेळी या शिष्टमंडळाने स्मार्ट सिटी बाबत पालिका तयार करीत अलेला प्लॅन समाजवून घेऊन त्यामध्ये भाजपाने काही मागण्या मांडल्या आहेत. या योजनेतू मुंबईला 1 हजार कोटी रूपये मिळणार असून त्यामध्ये अधिकचा निधीची मागणी पालिकेने केल्यासही ती मिळू शकेल आणि ती मागणी आयुक्त करतील असेही यावेळी आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले.
या शिष्टमंडळामध्ये उपमहापौर अलका केरकर, पालिका गटनेते मनोज कोटक, विधी समिती अध्यक्ष महेश पारकर, सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, शिक्षण समिती अध्यक्ष रितू तावडे, नगरसेविका राजश्री शिरवडकर, समिता कांबळे , ज्योस्ना मेहता, विणा जैन, सरिता पाटील आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता. या भेटीनंतर पत्रकारांना महिती देताना मुबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुबईचा समुद्र किनारा दुषीत झाला असून सुमारे 50 टक्के सांडपाणी प्रक्रिया न करता समुद्राता सोडण्यात येते. त्यामुळे या योजनेतमध्ये सांडपाण्यावर पक्रिया करण्याचा प्रस्तावाला प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने केली ती आयुक्तांनी मान्य केल्याची माहिती शेलार यांनी दिलि.
बेस्टची बस वेळेत येईल की नाही हे प्रवाशांना कळत नाही त्यामुळे अनेक वेळा बेस्टच्या बसस्टॉपवर उभा असलेला प्रवासी शेअर शिक्षा आणि अन्य वाहनाने प्रवास करतो. त्यामुळे मुंबईच्या प्रत्येक बेस्ट बसवर डिजिटल बोर्ड लावण्यात याव्यात व बेस्टवर जीपीआरएस सिसटीम बसविण्यात यावी ज्यामुळे कोणती बस किती वेळात पोहचेल याची माहिती प्रवशांना मिळेल आणि त्यामुळे बेस्टचा वापर करणाऱया प्रवाशांमध्ये वाढ होईल. त्याचा फायदा तोटयात असलेल्या बेस्ट उपक्रमाला होईल म्हणून ही योजना कार्यान्वयीत करण्यात यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.
मुबई महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेणाऱया रुग्णाला वेळोवेळी वेगवेगळया आरोग्य तपासण्या कराव्या लागतात. त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा खर्च होतो. म्हणून स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पालिकेने पेशंट रेकॉर्ड सिसटीम तयार करून त्याअंतर्गत प्रत्येक रूग्याला कार्ड देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबईतील झोपडपट्टत राहणाऱया मुंबईकरांना साथीच्या आजारात तात्काळ उपचार मिळावे म्हणून नवीव 100 दवाखाने उभारण्यात यावेत अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. मुंबईत वेगवेगळे हब तयार करण्यात येणार असून त्यामध्ये दक्षिण मुंबईत पर्यटन हब, परेल मध्ये बिझनेस हब, अधेरी वेस्टमध्ये आयटी हब तयार करण्याची पालिकेची योजना आहे. त्यामध्ये कांजूरमार्ग, मुंलुड परिसराचा समावेश करून या भागात पर्यावरण पूरक हब तयार करण्यात यावे ज्यामध्ये कांदळवणाचे उद्यान उभारण्यात यावे अशी मागणी या शिष्टमंडळाने केली तीही आयुक्तांनी मान्य केली.
कचरा व्यवस्थापनावर ही या योजनेत भ्रर देण्यात येणार असून त्यामध्ये कचऱयाच्या गाडीवर जीपीआरएस सारखी प्रणाली बसविण्यात यावी ऑडिओ फ्रिकवेंशी सारखी योजना तयार करून त्याचे एक अॅप्स तयार करण्यात यावेळी ज्यामुळे कचरा उचलला जात असल्याची माहिती नागरीकांना मिळू शकेल. यामध्ये डेब्रिजची विल्हेवाट लावण्यासाठी रिसायकल यंत्रणा उभी करण्यात यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे तीही आयुक्तांनी मान्य केली.
अग्निशमन दलासाठी कॅप्सुल लिप्ट आणा - भाजपामहापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये 90 मिटर उंचीची शिडी खरेदी करण्यात आली असून तीची आवश्यकताच आहे. त्यामुळे ती शिडी खरेदी करण्याचा निर्णय योग्यच आहे. मात्र ही शिडी उभी करण्यासाठी जॅक टू जॅक सात मिटरची जागा जागते. त्यामुळे मुंबईच्या शहर भागात ज्या ठिकाणी रस्ते लहान आहेत, मोकळया जागा नाहीत किंवा छोटया आहेत आणि दाटीवाटी आहेत अशा ठिकाणी ही शिडी कदाचित उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे अशा दाटीवाटीच्या भागात सहज वापरता येईल अशी इस्त्राईलने डेव्हल्प केलेली कॅप्सुल लिप्ट खरेदी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली त्याबाबतही पालिका सकारात्मक विचार करेल असे पालिका आयुक्तांनी या शिष्टमंडळाला सांगितले.
पालिका शाळांसाठी डिजिटल प्रणाली आणावी - भाजपापंतप्रधान नरेद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची संकल्पना मांडली आहे. या अंतर्गत महापालिका शाळांचा दर्जा सुधारजा जावा, माहितीचे संगन योगय पध्दतीने व्हावे तसेच विद्यार्थ्यांना इंटरनेट आणि वेबचा वापर करून शिकवता यावे यासाठी महापालिकेने ई तंत्रज्ञानावर आधारीत डिजिटल प्रणाली डेव्हलप करावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. त्यामध्ये शाळांच्या इमारतीचा दर्जा सुधारण्यासोबतच या प्रणालीचाही वापर केल्यास अध्यायन व अध्यापन, वेळेचे नियोजन, विद्यार्थी नोंद, वेतन व्यवस्थापन, शिष्यवृत्ती वाटप, प्रवेश प्रक्रिया याचेही नियोजन करता येणार आहे. तसेच खर्चावर नियंत्रण, पाल्याच्या प्रगतीची नोंद, पालकांचा सहभाग यासह शाळांचा एकूण दर्जा सुधारता येईल याबाबतचे एक सादरिकरण आयुक्तांकडे करण्यात आले. त्याबाबत आयुक्तांनी सकरात्मक विचार करण्याचे मान्य केले.
रेल्वेच्या नाल्यांसाठी मायक्रो टनेल बांधामुंबईतील रेल्वे रुळाच्या खालून गेलेल्या नाल्यामुळे पावसाळयात पाणी तूबंते आणि त्याचा फटका रेल्वेला बसतो व मुंबईकरांची जिवनवाहिनी ठप्प होते. म्हणून रेल्वे रुळाच्या खालून छोटे बोगदे तयार करण्याची योजना पालिकेने तयार केली आहे. या योजनेचे स्वागत करीत आमदार अॅड आशिष शेलार यांनी आयुक्तांच्या समोरच तात्काळ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत संयुक्त बैठक घेण्याची विनंती केली ती त्यांनी मान्य केली आहे. येत्या आठवडयात ही बैठक होणार आहे.
अतिक्रमणे हटविण्यासाठी व रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष दल असावेमुंबईतील अतिक्रमणे हटविता यावीत तसेच ती रोखता यावीत म्हणून पालिकेला विशेष पोलिस दल पुरविण्यात येईल, अशी घोषणा 2013 साली तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली होती. त्यानंतर पुढील कार्यवाही झाली नाही. पालिकेने या विशेष पोलिस दलासाठी प्रयत्न करावेत आणि पाठपूरवा करावा अशी मागणही या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली आहे.
