सार्वजनिक आरोग्य खात्याशी संबंधित अर्जांचे मसुदे संकेतस्थळावर उपलब्ध - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सार्वजनिक आरोग्य खात्याशी संबंधित अर्जांचे मसुदे संकेतस्थळावर उपलब्ध

Share This
माणसाचा सच्चा साथी म्हणून ओळखला जाणारा आणि अनेक मुंबईकरांच्या घरातील सदस्य असणारा पपी, डॉगी, मोत्या अर्थात आपला श्वान पाळण्यासाठी महापलिकेचे अनुज्ञापत्र प्राप्त करणे आता अधिक सोपे व सहज होण्याची शक्यता आहे. मुंबई महापलिकेच्या अधिनियम १९१ `अ’ नुसार पाळीव श्वानासाठी बंधनकारक असणारे महापलिकेचे अनुज्ञापत्र मिळविण्यासाठी करावयाचा अर्जाचा मसुदा अत्यंत सुस्पष्ट व सोपा करण्यात आला असून पूर्वीच्या नमुन्यातील किचकट भाग वगळण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य खात्याशी संबंधित असणा-या एकूण ७ अर्जांपैकी २ अर्जांच्या मसुद्यांचे सुलभीकरण करण्यात येत आहे.  यामध्ये श्वान अनुज्ञापत्र अर्ज व मुंबई महापलिका अधिनियम ३९४ / ४१२ `अ’ अंतर्गत आरोग्य अनुज्ञापत्र प्राप्त करावयाच्या अर्ज मसुद्यांचा समावेश आहे. तर उर्वरित ५ अर्ज हे वैधानिक असल्याने ते पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. हे सर्व अर्ज मसुदे / नमुने मराठी व इंग्रजी भाषेत महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर `नागरी सुविधा’ (Citizen Services) या `लिंक’ अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.


महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या नागरी सेवा सुविधांशी संबंधित विविध अर्जांच्या मसुद्यांचे सुलभीकरण करण्याचे प्रस्तवित असून यात सर्वप्रथम सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अर्जांचे सुलभीकरण करण्याचे येत आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार पाळीव श्वानासाठी बंधनकारक असणा-या अनुज्ञापत्रासाठीच्या अर्ज नमुन्यात यापूर्वी श्वान कुठुन आणला अथवा विकत घेतला, श्वान मुंबईबाहेरुन आणला आहे किंवा नाही, याप्रकारची महिती देणे आवश्यक होते. मात्र आता नवीन अर्ज मसुद्यामध्ये श्वान मालकाचे नाव, पत्ता यासह श्वानाचा संक्षिप्त तपशिल, रॅबिज लसीकरणाच्या प्रमाणपत्रासह संबंधित तपशिल नमूद करणे बंधनकारक असल्याचे सुचविण्यात आले आहे.

मुंबई महापलिका अधिनयम ३९४ / ४१२ `अ’ अंतर्गत आरोग्य अनुज्ञापत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणा-या अर्ज नमुन्याचे देखील सुलभीकरण करण्याचे प्रस्तवित असून पूर्वीच्या अर्जात असणारा किचकट भाग नवीन अर्ज मसुद्यात वगळण्यात आला आहे. हा अर्ज विविध आस्थापनांना अनुज्ञापत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे. या आस्थापनांमध्ये खाद्य पदार्थ तयार करणे व विकणे, उपहारगृह, मिठाईचे दुकान, औषध विक्रेत्याचे दुकान, तंबाखू उत्पादन व विक्री, तबेले, दळण व कांडप, धुलाईचे दुकान, पानाचे दुकान, केशकर्तनालय, निवासगृह (लॉजिंग), दारु किंवा ताडीचे दुकान, परमिट रुम, चॉकलेटचे दुकान, चहाचे दुकान, अगरबत्ती उत्पादन व विक्री, सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन, बर्फ बनविण्याचा कारखाना, मसाल्यांचे उत्पादन व विक्री, उसाच्या रसाचे दुकान, तेलाची घाणी, शीतगृह चालविणे, तयार खाद्यपदार्थांचा साठा व विक्री, पाण्याचा टँकर यासारख्या विविध बाबींशी संबिधित आस्थापनांचा समावेश होतो.

या अर्जांव्यतिरिक्त जन्मनोंदणी प्रमाणपत्र, मृत्यूनोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, गर्भ लिंग चाचणी प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) विषयक नमुना अर्ज आणि नर्सिंग होम नोंदणी विषयक नमुना अर्ज हे ५ अर्ज वैधनिक असल्याने त्यात बदल करण्यात आलेला नाही. तथापि, ह्या अर्जांचे नमुने देखील महापलिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर `नागरी सुविधा’ या `लिंक’ अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages