माजी सैनिकांचा मोदी सरकारला अल्टीमोटम - १९६५ युद्धाच्या सुवर्णजयंतीवर बहिष्कार टाकणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

माजी सैनिकांचा मोदी सरकारला अल्टीमोटम - १९६५ युद्धाच्या सुवर्णजयंतीवर बहिष्कार टाकणार

Share This
मुंबई / 20 August 2015
वन रँक वन पेन्शनचा िनर्णय नरेंद्र मोदी सरकारने लवकरात लवकर घ्यावा, अन्यथा २८ आॅगस्ट रोजी  होणाऱ्या १९६५ युद्धाच्या सुवर्णजयंती कार्यक्रमावर देशातील लाखों माजी सैिनकांकडून बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा आंदोलनाच्े नेते िब्रगेडिअर सुधीर सावंत यांनी िदला आहे.


१५ आॅगस्ट रोजी लाल िकल्ल्यावरुन वन रँक वन पेन्शनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील अशी आंदोलक सैनिकांची अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरल्याने माजी सैनिकांमध्ये कमालिचे असंतोषाचे वातावरण आहे.  अलिकडे निवृत्त झालेल्या सैनिकांना भरघोस िनवृत्तवेतन िमळते. मात्र १९६५ च्या युद्धात पाकिस्तानशी दोन हात केलेल्या, आता ७० ते ८० वयोमान असलेल्या या शूर सैनिकांना आिण शहिदांच्या िवधवांना तुटपुंजे वेतन का? असा सवाल या माजी सैनिकांचा आहे.


११ आॅगस्ट रोजी िदल्लीतील जंतरमंतर येथे माजी सैनिकांच्या सत्याग्रहावर पोलिसांनी लाठीमार केला. १५ आॅगस्ट रोजी लाल िकल्ल्यासमोर सुद्धा या माजी सैनिकांना पोिलसांच्या लाठ्या खाव्या लागल्या. दमनतंत्र वापरुन मोदी सराकरने या माजी सैनिकांचा घोर अपमान आहे, असा आरोप या ब्रिगेडिअर सावंत यांनी केला आहे.

मोदींनी निवडणुकीपूर्वी वन रँक वन पेन्शनचे आश्वासन िदले होते. मोदी बिहारसाठी १ लाख २५ हजार कोटी रुपये देतात आिण युद्धात मर्दूमकी गाजवलेल्या या शूर सैनिकांसाठी केवळ ८ हजार कोटी देताना का हात अखडता घेतात ? असा सवाल या सैनिकांनी केला आहे.

केंद्राच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. पण त्याचा लाभ या वयोवृद्ध माजी सैनिकांना िमळणार नाही. अलिकडे िनवृत्त झालेल्या सैनिकांना मात्र तो िमळणार आहे. सातव्या वेतन आयोगाने या सैनिकांमधील िनवृत्तीवेतनातील तफावत आणखी रुंदावणार आहे. त्यामुळे वन रँक वन पेन्शनच्या लढ्याला महत्व आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages