पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका - लाचखाऊ ४९ अधिकारी -कर्मचारी निलंबित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका - लाचखाऊ ४९ अधिकारी -कर्मचारी निलंबित

Share This
मुंबई  :   20 August 2015
अनधिकृत बांधकाम, लायसन्स, आदी नियमबाह्य परवानग्या देण्यासाठी लाच मागणाऱ्या  ४९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पालिकेने  निलंबित केले आहे. यामध्ये उपायुक्त, अभियंता, मुख्य अभियंता, मुकादम, कामगार यांचा समावेश आहे. चौकशीत दोषी आढळ‌णाऱ्यांवर सेवेतून बडतर्फ ची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान या कारवाईनंतरही चिरीमिरी मागणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा ओघ कमी झालेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या १० वर्षापासून पालिकेतील १०१ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या तक्रारी संबंधित वॉर्डातून येत होत्या. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेकडे हवा तसा ठोस पुरावा मिळत नव्हता. मात्र एसीबीने साफळा रचून यातील ४९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पकडल्यानंतर पालिकेने तात्काळ या सर्वांवर निलंबनाची कारवाई केली. वर्षभर चौकशी सुरु राहणार असून त्यात दोषी आढळणाऱ्या अधिकारी -कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. वॉर्डातून अशा प्रकारच्या पालिकेकडे येणाऱ्या तक्रारींची नियुक्त करण्यात आलेल्या चारही अतिरिक्त व उपायुक्त आयुक्तांची  समितीकडून चौकशी केली जाते. मात्र ठोस पुरावे मिळेपर्यंत कारवाई सुरुच राहते. त्यामुळे तक्रारी येऊनही कारवाईसाठी १० वर्षाचा कालावधी जातो. त्यामुळे चिरीमीरी घेणाऱ्या अधिकारी -कर्मचाऱ्यांचे फावत असल्याचे या प्रकरणावरुन स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या तक्रारींची प्रशासनाकडून चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

निलंबित झालेले अधिकारी,कर्मचारी
उपायुक्त    :  २
कार्यकारी अभियंता  : २
सहा. अभियंता   :   ८
उप अभियंता        :   १२
अतिरिक्त अभियंता  :  ७
मुकादम             :  ८
कामगार           :   ५
लिपिक                :   ५

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages