मुंबई । अजेयकुमार जाधव
मुंबईमधे विविध आजर हे स्वच्छता नसल्याने होत आहेत. या अस्वच्छतेला पालिका प्रशासन आणि घन कचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी ठरल्या वेळेत कामच करत नसल्याने सफाई कर्मचारी जबाबदार आहेत असा आरोप केल्यावर कर्मचारयाँना बायोम्याट्रीक हजेरी सक्तीची केली जाइल असे अतिरिक्त पालिका आयुक्त श्रीनिवास यांनी स्थायी समितीत सांगीतले.
पालिका 8 लाख किलो जंतुनाशक पावडर खरेदी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला असता ही पावडर सफाई केल्यावर कचऱ्याच्या ठिकाणी पावसाल्यात मारली जाते. पावसाला अर्धा संपत आला असताना पावडर मागवून काय फायदा असा प्रश्न सदस्यानी उपस्थित केला. याच वेळी सफाई होत नसल्याने मुंबईमधे विविध रोग पसरतआहेत. 70 टक्के सफाई कर्मचारी कमावाराच नसतात. 3 हजार कोटी रुपये घन कचरा व्यवस्थापनावर खर्च करूनही मुंबई 140 व्या क्रमांकावर आहे. सफाई कर्मचारी कमावाराच नसल्याने ही परिस्थिती असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले. मोठ्या संखेने कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याने यांत्रिकीपद्धतीने सफाई करावी अशी मागणी देशपांडे यांनी केली.
विनोद शेलार यांनी कर्मचाऱ्याच्या हजेरीवर आणि कामावर कोणाचा अंकुश नसल्याने बायोम्य़ाट्रीक मशीन लावावी आणि त्या मशीन मधून मिळणाऱ्या डेटावरुन पगार काढावा अशी मागणी शेलार यांनी केली. कर्मचाऱ्यावर वेळ पडल्यास कारवाई करावी युनियनची पर्वा करू नए अशी सूचना सदस्यानी केली. यावर अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांनी घन कचरा व्यवस्थापन विभागात बायोम्य़ाट्रिक मशीनचा प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवला जाणार आहे. यामधिल डेटा वरुन पगार काढला जाणार असल्याचे श्रीनिवास यांनी सांगितले.
