मुंबई,बुधवार ( प्रतिनिधी ) मुंबई महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वडाला येथील अक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयाची अत्यंत दूरव्यवस्था झाली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच सलाईनची आवश्यकता असलेल्या रेखा व अशोक या दोन कुष्ठ रुग्णांचा मृत्यू झाला, असा आरोप भाजपचे नगरसेवक विनोद शेलार यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केला.
प्रशासनाच्या अक्ष्यम्य हलगर्जीपणामुळेच या कुष्ठ रुग्णालयात अनेक कुष्ठरोगी किमान २५ ते ५० वर्ष खितपत पडले आहेत. या रुग्णालयात कर्मचारी शनिवार व रविवार सुट्टीवर असल्याने रुग्णांना आवश्यक सलाईन दिले जात नाही. परिणामी २ कुष्ठरुग्णांचा दुर्देवीरित्या मृत्यू झाला. या रुग्णालयात ढेकणांचा सूळसुळाट झाला आहे. त्याचा त्रास या रुग्णांना होतो. मात्र नाईलाजणे त रुग्ण हा त्रास सहन करतात. येथील शौचालयात स्वच्छता नसल्याने भयंकर दुर्गंधी सामोरे जावे लागते,अशी पोलखोल विनोद शेलार यांनी केली.
कुष्ठ रुग्णालयात कर्मचार्यांना घरी लवकर जायचे असते, त्यामुळे या रुग्णांना दुपारचे जेवण सकाळी १० वा. अतर रात्रीचे जेवण दुपारी ४ वा खावे लागते अशी माहिती शेलार यांनी दिली. त्यांना डोळ्यांचा व अन्य गंभीर आजार झाला तर त्यांना के.ई. एम रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध सुद्धा होत नाही. हे रुग्ण बस मधून पण प्रवास करत नाही कारण इतर प्रवासी त्यांना माजव करतात त्यामुळे ना इलाजाने काही एनजीओची मदत घेतली जाते. या रुग्णालयात काही कुष्ठरोगी असेही आहेत की, ज्यांना नातेवाईक न्यायला येत नाहीत.
शेलार यांनी या बाबत अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांना या रुग्णालयातील दुरव्यवस्थेबद्दल अवगत केले. मात्र अध्याप त्या रुग्णालयात सुधारणा झालेली नाही. प्रशासनाने गंभीर दखल घेऊन रुग्णालयाच्या दूरव्यवस्थेबाबत लक्ष घालावे, अशी मागणी शेलार यांनी केली. शिवसेनेच्या डॉ.अनुराधा पेडणेकर यांनीही शेलार यांना समर्थन देत सदर रुग्न्ल्याची दूरव्यवस्था दूर करण्याची मागणी केली. कुष्ठरोग्यांना पालिका दरमहा हजार रुपये देणार होती परंतु अध्याप त्यांना एक ही पैसा मिळाले नाही. प्रशासनाने या बाबत खुलासा करावा,अशी मागणी पेडणेकर यांनी केली. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रकरण गंभीर असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे व योग्य ती कारवाई करावी असे आदेश दिले.
