हलक्या दर्जाच्या अनेस्थेशिया मशीन प्रकरणी अतिरक्त आयुक्तांमार्फ़त चौकशी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हलक्या दर्जाच्या अनेस्थेशिया मशीन प्रकरणी अतिरक्त आयुक्तांमार्फ़त चौकशी

Share This

माजी अतिरिक्त आयुकतांचीही चौकशी 
मुंबई  / अजेयकुमार जाधव 
मुंबई महापालिकेने आरोग्य विभागासाठी खरेदी केलेल्या भूल देण्याच्या (अनेस्थेशिया वर्कस्टेशन) मशिनमध्ये ३ कोटी ६२ लाख ७० हजाराचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. युनिव्हर्सल ऑरगॅनिक्स या कंत्राटदार कंपनीने खरेदी केलेल्या ५१ मशिनपैकी २० मशिन इंग्लंड व उर्वरित ३१ मशिन चायनामेड तसेच भारतात तयार केलेली हलक्या दर्जाच्या मशिन खरेदी करून पालिकेला पुरवठा केल्या. यासाठी कंपनीने बनावट जकात पावत्या, चलन, बनावट कस्टमच्या पावत्या अशा प्रकारे बनावट कागदपत्रे जमा केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि दोषी लोकांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवीण छेड़ा व मनोज कोटक यानी स्थायी समितीत केली.

या सर्व मशिन्स मुंबईतील रुग्णालयात वापरात असून रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केला होता. याची उपायुक्त दर्जाच्या अधीकारयामार्फ़त चौकशी सुरु आहे. परंतू उपायुक्त असलेला अधिकारी आपल्या वरिष्ठ असलेल्या अतिरिक्त आयुक्तांची चौकशी करू शकत नसल्याने आताच्या अतिरिक्त आयुक्तानी चौकशी करावी अशी मागणी छेडा व् कोटक यांनी केली.

पालिकेने मुंबईतील रुग्णालयात भूल देणाऱ्या (अनेस्थेशिया वर्कस्टेशन) या ५१ मशिन उपलब्ध करण्यासाठी २०१३ ला युनिव्हर्सल ऑरगॅनिक्स या कंपनीला ६ कोटी ४२ लाखाचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीने यापूर्वी तीनवेळा महापालिकेने दिलेल्या कंत्राटामध्ये गोलमाल केल्याचा आरोप असतानाही त्यात कंपनीला पालिकेने हे चवथे कंत्राट दिले. मात्र या कंत्राटामध्येही पालिकेला फसवले. एका अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या पत्राच्या आधारे केलेल्या चौकशीतून हा घोटाळा समोर आला. यात ५१ मशिनपैकी ३१ मशिन या चायनामेड अत्यंत हलक्या दर्जाच्या मशिन खरेदी करून त्या मशिन पालिकेच्या रुग्णालयात पुरवठा केल्या. यासाठी जमा केलेली सर्व मशिन बनावट असल्याचे समोर आल्यावर या कंपनीला पालिकेने ब्लॅकलिस्ट केले आहे. 

सीपीडी म्हणजेच मध्यवर्ती खरेदी खात्याच्या चौकशी अहवालात घोटाळा झाल्याचे दिसून येतेय. पण दक्षता विभागाला मात्र या घोटाळा दिसत नाही. यामध्ये मुंबई महापालिकेचे अधिकारी तसेच अतिरिक्त आयुक्तही सहभागी असल्याचा आरोप करीत या घोटाळ्याची एसीबीमार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा, सपाचे रईस शेख आदी सदस्यांनी केली आहे. मागील स्थायी समितीच्या बैठकीत छेडा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून या घोटाळ्याकडे लक्ष वेधले. यावर विरोधी पक्ष व सत्ताधाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. या गंभीर मुद्द्यावर आयुक्तांनी येत्या बैठकीत खुलासा करावा असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आयुक्तांना दिले होते.

याबाबत चौकशी सुरु असतानाच या कंपनीला काळ्या यादीत टाकणारे उपायुक्तांना सक्तिच्या रजेवर पाठवले गेल्याने स्थायी समिती सद्स्यानी संताप व्यक्त करत तत्कालीन व आताच्या सम्बंधित अतिरिक्त आयुक्तांची चौकशी करावी अशी मागणी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी अतिरिक्त आयुक्तांमार्फ़त चौकशीचे आदेश देवून पुढच्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages