मुंबई महापालिकेच्या वतीने पुरवठा करण्यात येणा-या पाण्यापैकी आठ टक्के नमुन्यातील ८ टक्के नमुने हे दुषित ठरले आहेत. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचा आढावा घेतला तर महिन्याला सरासरी चार हजार पाण्यांचे नमुने घेतले जातात. मात्र, यामध्ये दूषित पाण्याचे प्रमाण वाढत जाताना दिसून एप्रिलमध्ये जिथे १३७ पाण्याचे नमुने दुषित ठरले तिथे मे महिन्यात ४१६२ नमुन्यांपैकी २३४ नमुने दुषित ठरले. परंतु जूनमध्ये हे प्रमाण वाढले गेले. जूनमध्ये ४५६४ नमुन्यांपैकी ३७४ नमुने दुषित ठरले. त्यामुळे अनफिट ठरलेल्या पाण्याचे नमुन्यांचे प्रमाण तीन महिन्यांमध्ये ०.५ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर जावून पोहोचला आहे.
दूषित पाण्याबरोबरच तपासणी केलेल्या पाण्यात ई-कोलाय विषाणू आढळले. जूनमध्ये घेतलेल्या ४५६४ नमुन्यांपैकी ७८ नमुन्यांमध्ये ई-कोलाय विषाणू आढळला. या ई-कोलायमुळे पोटाचे आजार बळावू शकतात. काविळ आणि अतिसाराचे आजार उद्भवू शकतात. जून महिन्यातच ई-कोलायचे सर्वाधिक नमुने मुलुंड, कुलाबा-नरिमन पॉईंट,मोहम्मद अली,जे.जे परिसर, ग्रँटरोड, लोअर परळ-वरळी आदी भागांमध्येच ई-कोलाय पाणी आढळून आले असल्याचा अहवाल महापालिकेच्या जलअभियंता विभागाने सादर केला. पाण्याच्या नमुना तपासणीचा अहवाल सादर करण्याची मागणी माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी केली होती. ही मागणी प्रशासनाने मान्य केली असून ऑगस्ट महिन्यापासून दूषित पाण्याच्या नमुना तपासणीची माहिती स्थायी समितीच्या बैठकीपुढे ठेवली जाणार आहे.
