मुंबई दि 18ज्या झोपडपट्टी पुनर्विकास झाला त्या इमारतीचे काम योग्य पद्धतीने झाले आहे की नाही त्याचा फिजिकल सर्वे करता यावा; ज्या योजना रखडल्या आहेत त्यांना वेग देता यावा तसेच त्यातील अडचणी दूर करण्यासाठी सरकारने एक टास्क फोर्स तयार करावा अशी मागणी आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली
भाजपाच्या झोपडपट्टी जनता परिषदे तर्फे आज दादर येथील वसंत स्मृती सभागृहात आज मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास समस्या आणि उपाय या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता यावेळी मुंबईतील महापालिका; एमएमआरडीए ; बिपीटी सह अन्य झोपडपट्टीतील रहिवाशी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते
या परिसंवादात माजी नगरसेवक अरुण देव ; मुंबईचे महामंत्री सुनिल राणे; झोपडपट्टी जनता परिषदेचे अध्यक्ष बाबा सिंह आणि मुंबईचे अध्यक्ष अनिल ठाकूर, नगरसेवक महादेव शिवगण आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना आमदार अॅड आशिष शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना जाहीर केलेल्या योजनांचा आढावा घेतला तर त्यासोबतच त्यांनी झोपडपट्टी पुनर्विकास समस्या सोडविण्यासाठी सरकारने केलेल्या बदलाची माहीती दिली.
मुंबईतील सीआरझेड मधील झोपडपट्टी च्या पुनर्विकास बाबत येत्या सहा महिन्यात नवी योजना सरकार जाहीर करेल अशी माहिती दिली. तसेच मुंबईतील 2000 पर्यंत च्या झोपडपट्टी ला संरक्षण देण्यात आले आहे या नियमानुसार वन प्लस वन झोपडीला ही संरक्षण मिळावे म्हणून सरकारकडे भाजपा मागणी करेल अशी ग्वाही दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022पर्यंत सर्वानाच घर मिळावे असे एक स्वप्न पाहिले आहे एक संकल्प केला आहे तो पूर्ण करण्यासठी या राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार वेळेस धोरणात्मक बदल करून पंतप्रधानां चे स्वप्न पुर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला
झोपडपट्टी पुनर्विकास करताना देण्यात येणारा काॅर्फस फंड अपुरा असून त्यामध्ये महागाईच्या निर्देशांकनुसार वाढ करण्यात यावी आणि झोपडपट्टी चे खटले लवकर निकाली निघावे यासाठी स्वतंत्र कोर्ट निर्माण करण्याची मागणी आपण सरकारकडे करणार आहे असेही त्यांनी सांगितले