मुंबई, ता.१८ः रा.सु. उर्फ दादासाहेब गवई यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्राला एकसं ठेवण्याचे काम केले, गवईंनी राज्य चालवण्याचे व वेगळ्या राजकीय भूमिका असल्या तरी सार्वजनिक जीवनात व्यक्तिगत सलोखा कसा ठेवायचा याचे धडे दिले अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गवईंच्या कार्याचा गौरव केला. वैदर्भीय नागरिक मनाने किती मोठा आहे हे गवईंनी दाखवून दिले, विधानपरिषदेत जेव्हा संघर्षाचे प्रसंग येत तेव्हा गवईंच्या दालनात समन्वय घडत असे असे पवार म्हणाले. रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते रा.सु.गवई यांच्या सर्वपक्षीय श्रध्दांजली सभेत ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले आंबेडकरी विचार हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार, त्यांचे देश उभारणीतील प्रयत्न गवईंनी जगासमोर मांडले. उपेक्षित समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील होते. बाबासाहेबांच्या विचारांच्या शिलेदारांना एकत्रित करण्यासाठी गवईंनी नेहमीच पुढाकार घेतला. दीक्षाभूमी उभारणीचे पूर्ण श्रेय गवईंनाच जाते. प्रत्येक नवीन मुख्यमंत्र्याकडे त्यांनी दीक्षाभूमीसाठी पाठपुरावा केला असे पवार म्हणाले. वसंतराव नाईक व गवईंची गाढ मैत्री होती. जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, गवई व आपली मैत्री शेवटपर्यंत टिकली असे पवार म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी या सभेचे आयोजन केले होते, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ राजेंद्र गवई, खासदार राजू शेट्टी, संजय राऊत, ५ भालचंद्र मुणगेकर, आमदार अबू आसिम आझमी, महादेव जानकर, बाळासाहेब थोरात, विनायक मेटे, भाई गिरकर, माजी मंत्री जयवंतीबेन मेहता, अविनाश महातेकर, उत्तम खोब्रागडे, प्रकाश रेड्डी, गौतम सोनावणे उपस्थित होते.
गवईंच्या स्मारकासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करुन जागा व निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सत्तेच्या किंवा संख्याबळावर नव्हे तर सर्व पक्षांच्या सदस्यांसोबत असलेल्या वैयक्तिक संबंधामुळे ते केली. विधानपरिषदेत एकमेव सदस्य असतानाही सलग तीस वर्षे ते उपसभापती व सभापती होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी समाजहिताचा विचार केला, त्यांनी नेहमी गुणवत्तेवर भर दिला, गवईंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच दीक्षा भूमी हे जागतिक आकर्षणाचे केंद्र बनलेला प्रकल्प पूर्ण झाला. माझ्या वडिलांचे ते जवळचे मित्र होते, वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मला दिलासा दिला व माझ्या पाठीशी उभे राहिले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गवईंनी विधानपरिषद व राज्यसभेत केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांची पुस्तिका तयार करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. गवई हे सर्वसमावेशक नेतृत्व होते, समाजातील अस्पृश्यता दूर करण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले तर राजकारणातील अस्पृश्यता दूर करण्याचे काम गवईंनी केले असे मुख्यमंत्री म्हणाले.
सर्वसमावेशक राजकारण करण्याचा प्रयत्न करु व हीच खरी त्यांना आदरांजली असेल, असे ते म्हणाले.
गवईंनी संसदीय राजकारण करताना नेहमी भूमिकेला न्याय दिला, भूमीहीन आंदोलनामध्ये त्यांनी मोठे काम केले, त्यांना सत्तेची मग्रुरी कधीही नव्हती, अशा शब्दांत रामदास आठवले यांनी गवईंच्या कामाचे कौतुक केले. गवई पक्के आंबेडकरवादी होते, गवईंमुळेच नागपूरात भव्यदिव्य दीक्षाभूमी झाली असे ते म्हणाले.