सुधार समितीने प्रस्ताव परत पाठवला
मुंबई,गुरुवार ( प्रतिनिधी ) -:शाकाहारी विरुद्ध मासांहारी हा वाद गुरुवारी सुधार समितीत चांगलाच पेटला भाजप विरुद्ध सवॅ पक्ष एकत्र आले आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले जैन आणि मारवाडी विकासक मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा प्रयत्न करीत असून याद्वारे ते शाकाहारी आणि मासांहारी असे विभाजन करू पाहत आहेत. अशा प्रकारे मुंबईत शाखारी विरुद्ध मासांहारी असा फाळणी करण्याचा हा घात थांबविण्यासाठी पालिका प्रशासनाने निर्णय घेण्याची गरज असल्याचे मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे यांनी आज सुधार समितीत ठणकावून सांगितले.
मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी मासांहारी लोकांना घरे नाकारणाऱ्या विकासकांना ओसी देण्यात येवू नये अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर पालिका आयुक्तांनी असा नियम नसल्याचे सांगत हात वर करण्याचा प्रयत्न केला. सदर प्रस्तावावर आज सुधार समितीत दिलीप लांडे यांनी आक्रमक पवित्र घेत अशाप्रकारे मुंबईत मराठी माणसावर अन्याय होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. अशा प्रवृत्तींना पालिका प्रशासनाने जागेवरच ठेचले पाहिजे, असे सांगत सदर प्रस्ताव परत पाठविण्याची मागणी केली.
मनसेला समर्थन देताना समाजवादी पार्टीचे अश्रफ आझमी यांनी कोणी काय खायचे हे ठरविण्याचा अधिकार इतर कोणाला नाही असे सांगत अशाप्रकारे मासांहारी लोकांना घरे नाकारून शाकाहारी-मासांहारी मध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न काही विकासंकाकडून होत असल्याचा आरोप केला. यासाठी पालिकेने डीसीआर मध्ये सुधारणा करावी, अशी सूचना त्यांनी केली. तर कॉंग्रेसच्या मोहसीन हैदर यांनी मुंबईत 'क्लास डिफरन्सी' बनविली जात असल्याचा आरोप करीत कायद्यात तरतूद नसेल तर तरतूद करा तो पर्यंत सदर प्रस्ताव परत पाठवा असे सांगितले. मनसेचे चेतन कदम यांनी शाकाहारी-मासांहारी असा वाद घालणाऱ्या प्रवृतींना मुभा देवू नये असे सांगितले तर संतोष धुरी यांनी प्रशासनाला विकासकांच्या ताटाखालचे मांजर म्हणून जगायचे आहे असे सांगत सोसायटयांना आरक्षण पद्धत लागू करण्याची मागणी केली.
शिवसेनेचीही साथ
शिवसेनेच्या जेष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी या विषयावर मांडताना अशाप्रकारची बंधने योग्य नसून ती थांबवायला हवीत असे सांगत मोहसीन हैदर यांच्या उप सूचनेला पाठींबा देत पालिका कायद्यात बदल करण्यास अनुमती दिली. तर राजू पेडणेकर यांनी गेल्या अनेक वर्षापासून मुंबईकर असलेल्यांना इतर भाषिकांना शाकाहारी- मासांहारी वादामुळे फरक पडणार नसल्याचे संगीतले.
शुभा राऊळ यांचा सभात्याग
या चर्चे दरम्यान धर्म, जात यावर चर्चा होत असल्याने अशी चर्चा करू नये असे सांगत सभात्याग केला. मात्र काही वेळाने त्या पुन्हा परतल्या आणि उपसूचनेला पाठींबा देत कोणाला टार्गेट करणे चुकीचे असल्याचे सांगितले. शाकाहारी- मासांहारी वाद अधिक चिघळू नये याचा विचार करून सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी या विषावर व्यापक चर्चा होणे अव्याश्यक असल्याचे सांगत सदर प्रस्ताव परत पाठविण्याचा निर्णय घेतला.
