मुंबई: हार्बर मार्गावरील बहुप्रतीक्षेत असणारा डीसी-एसी प्रकल्प मध्य रेल्वेने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील सीएसटी ते पनवेल या स्थानकांदरम्यान डीसी (डायरेक्ट कंरट) चे एसी (अल्टरनेट करंट) मध्ये विद्युत रूपांतर करण्याचे क ाम हाती घेण्यात येणार आहे. मार्च २0१६ पर्यंत हे काम पूर्ण होणार असून हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.
हार्बर मार्ग हा संपूर्णपणे डीसीवर चालतो. डीसी मार्गाचे एसी विद्युत रुपांतरण करण्याचा प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडलेला आहे. त्यामुळे आजही हार्बर मार्गावरील लोकल गाड्या या ९ डब्यांच्याच चालवण्यात येतात. हार्बर मार्गावरील डीसी (डायरेक्ट करंट) चे एसी (अल्टरनेट करंट) मध्ये विद्युत रूपांतर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आली होती. हा रखडलेला प्रकल्प आता मध्य रेल्वेने हाती घेण्याचे ठरवले आहे. मार्च २0१६ पर्यंत हार्बर मार्ग संपूर्णपणे एसीवर चालणारा असेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे डीआरएम अमिताभ ओझा यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हार्बर मार्गावरील डीसी-एसीचे विद्युत रुपांतरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर विजेची मोठय़ा प्रमाणात बचत होणार असून गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात बचत होणार आहे.