एसटीलाही फुकट्या प्रवाशांचा भुर्दंड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एसटीलाही फुकट्या प्रवाशांचा भुर्दंड

Share This

 फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वे आणि मुंबईतील बेस्ट त्रस्त असतानाच आता एसटी महामंडळाचीही यात भर पडली आहे. २0१४-१५मध्ये तब्बल १५ हजार ४३0 फुकटे प्रवासी एसटीत आढळले आहेत. एसटी महामंडळाला अनेक कारणास्तव आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यात फुकट्या प्रवाशांची भर पडली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासा़ठी बसेसची आणि वाहकाची तपासणीही केली जाते. २0१४-१५मध्ये ११ लाख ४७ हजार २८९ बसेसची तर ५५ हजार ८११ वाहकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये भाडे वसूल करून तिकीट न देणे, भाडे न घेता तिकीट न देणे, कमी भाडे वसूल, जुन्या तिकिटांची पुनर्विक्री, कमी रोकड मिळणे, जादा रोकड मिळणे अशी काही प्रकरणे नोंदविली गेली. विनातिकिट आढळलेल्या प्रवाशांवरही कारवाई करण्यात आली. एसटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत तब्बल १५ हजार ४३0 विनातिकीट प्रवासी आढळले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages