सावित्रीबाई फुले स्मारकासाठी निधी देणार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सावित्रीबाई फुले स्मारकासाठी निधी देणार - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

Share This
मुंबई. दि. 26 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, हे स्मारक उभारण्यासाठी जागेची पाहणी करुन परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशा सूचना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्या.

सह्याद्री अतिथिगृह येथे वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार गोपालदास अग्रवाल, अतिरिक्त मुख्य सचिव पी.एस. मीना, वित्त विभागाचे प्रधान सचिव (व्यय) सीताराम कुंटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू व इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते

Displaying IMG-20150826-WA0048.jpg

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages