रस्त्यावरील खड्डय़ांबाबत संकेतस्थळाच्या उपक्रमाची जनजागृती करावी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रस्त्यावरील खड्डय़ांबाबत संकेतस्थळाच्या उपक्रमाची जनजागृती करावी

Share This
मुंबई : पावसाळ्यात रस्त्यावर निर्माण होणार्‍या खड्डय़ांबाबत तक्रार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या उपक्रमाची उच्च न्यायालयाने प्रशंसा केली. मात्र सामान्यांना याबाबतची कल्पना नाही. यामुळे या संकेतस्थळाबाबत सर्वसामान्यांना माहिती मिळण्याच्या हेतूने जनजागृती करावी, अशी सूचना न्यायालयाने मुंबई मनपाला केली.
खड्डय़ांच्या तक्रारीसाठी उभारण्यात आलेल्या संकेतस्थळावर १ जूनपासून साडेतीन हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहे. यापैकी ३ हजार २६५ तक्रारींचे निरसन करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या प्रतिनिधीने न्या.ए.एस.ओक आणि न्या. के.आर.श्रीराम यांना दिली.अँडरॉईड तंत्रज्ञान वापरणार्‍यांसाठी हे संकेतस्थळ उपयुक्त आहे.

अँँडरॉईड मोबाइलद्वारे संकेतस्थळावर सहज तक्रार नोंदवता येऊ शकते. मात्र अँपल मोबाईलमधून तक्रार नोंदवताना अडचणी निर्माण होतात. यावर तोडगा काढण्यासाठी अँपल कंपनीला पत्र लिहिले असून तांत्रिक समस्या दूर कराव्यात, असे आवाहन केले असल्याची माहिती पालिकेच्या प्रतिनिधीने न्यायालयास दिली.

रस्त्यावर पावसाळ्यात नेहमीच खड्डे पडतात असे चित्र दिसून येते. याचा फटका वाहन चालक आणि सर्वसामान्यांना बसतो. मात्र या परिस्थितीतून मार्ग काढताना नेहमीच प्रशासकीय यंत्रणा वेळकाढूपणा धोरण बजावते. पालिकेची खड्डय़ांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी कार्यरत असलेले संकेतस्थळ उत्तम असून अल्पावधीत त्याला मिळालेला प्रतिसाद उत्तम असल्याचे न्या.ओक म्हणाले. पालिकेने १0 सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages