बेटी बचाओ - बेटी पढाओ मुलुंडमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेटी बचाओ - बेटी पढाओ मुलुंडमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम

Share This
मुंबई, बुधवार (प्रतिनिधी)- ‘बेटी बचाओ- पेटी पढाओ’ ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात राबवित आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रंमाक १०२ चे नगरसेवक आणि सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंड सेवा संघाच्या विद्यमाने लोकसाहित्यकार दिकरी व्हालनो दरियो ‘मॉं- बाप को भूलों नहीं’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. शनिवार २९ ऑगस्ट रोजी सांयकाळी ७ वाजता मुलुंड येथील कालिदास ऑडिटोरियमध्ये होईल. याच दिवशी गंगाधरे यांच्या पत्नी आशाताई गंगाधरे यांचाही वाढदिवस आहे. याप्रसंगी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, खासदार किरीट सोमय्या, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, आमदार सरदार तारासिंग, आमदार राम कदम, उपमहापौर अलका केरकर, भाजपा पालिका गटनेते मनोज कोटक, नगरसेविका समिती कांबळे, विनायक कामत, श्रीनिवास त्रिपाठी आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिगर चंदे, सुनील टोपले, राजेंद्र मोहीते, संजय डोढीया यांनी केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages