मुंबई: नवजात बालकांना पहिल्या पाच वर्षांमध्ये आवश्यक ती वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने क्राय – चाइल्ड राइट्स अँड यूने “हेल्दी स्टार्ट” नावाची देशव्यापी निधीउभारणी व जागृती मोहीम सुरू केली आहे. वयाच्या 0 – 5 या महत्त्वाच्या वर्षांमध्ये बालकांशी संबंधित असलेल्या विविध विषयांवर ही मोहीम भर देणार आहे आणि यातील कमतरता भरून काढण्यासाठी, बालकांसाठीचे हक्क बजावले जावेत यासाठी काम करणार आहे.
भारतात अंदाजे 13.8 कोटी बालके 0-5 वयोगटातील आहेत. परंतु, आयुष्याची निरोगी सुरुवात करण्यापासून ते वंचित आहेत. तीन वर्षांखालील अंदाजे 40.4% भारतीय बालके आवश्यकतेपेक्षा कमी वजनाची आहेत. तीन वर्षांखालील अंदाजे 80% बालकांना अॅनिमिया आहे. 12-23 महिने वयाच्या केवळ 44% बालकांना सहा प्रमुख प्रतिबंधात्मक आजारांपासून पूर्णतः लसीकरण केले जाते. 10 लाख बालके त्यांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच मरण पावतात. केवळ 50% गरोदर स्त्रियांची योग्य काळजी घेतली जाते. सरकारने आयसीडीएस (एकात्मिक बाल विकास योजना) यासारख्या योजना राबवल्या असून, त्याअंतर्गत अंगणवाडी केंद्रे (एडब्लूसी) 6 वर्षांखालील बालकांना निगा आणि पूरक पोषण पुरवले जाते. परंतु, या योजना अपेक्षेइतक्या प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत. 6 वर्षांखालील केवळ साधारण 52% बालकांना आयसीडीएस मार्फत पूरक पोषण मिळते. एडब्लूसीने सेवा देणे अपेक्षित असलेल्या बालकांपैकी एक तृतियांश कमी बालकांना सेवा दिली जाते.
क्राय – चाइल्ड राइट्स अँड यूच्या रिसोर्स मोबिलायझेशन च्या संचालक अनिता बाला शरद म्हणाल्या, “गेली तीन दशके बालकांसाठी काम करत असताना, बालकासाठी पहिली पाच वर्षे किती महत्त्वाची असतात ते आमच्या लक्षात आले आहे. सेवा उपलब्धत नाहीत, मातांची पुरेशी काळजी घेतली जात नाही, कमी जाणीवजागृती व संवेदनशीलता यामुळे अनेक बालकांना या टप्प्यात गरजेची असलेली पुरेशी देखभाल मिळत नाही, त्यामुळे कदाचित बालकाच्या विकासामध्ये कायमचे अडथळे येत असावेत. आम्हाला अपेक्षित असलेले बदल घडवण्यासाठी “हेल्दी स्टार्ट” हे एक पाऊल उचलले आहे आणि या बालकांना निरोगी भविष्यासाठी संधी दिली जाईल, याची काळजी घेतली जाणार आहे.”
बालकाच्या जीवनातील पहिल्या पाच वर्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही सुरुवातीची वर्षे बालकाचे भविष्यातील आरोग्य, आनंद, वाढ, कुटुंब व समाजातील विकास, एकंदर जीवन ठरवत असतात. या महत्त्वाच्या वर्षांत मेंदूचा विकास सर्वोच्च टप्प्यात असतो आणि नंतरच्या जीवनातील बालकाचे शिकण्याचे कौशल्य, सामाजिक व भावनिक कौशल्य यावर थेट परिणाम होत असतो. माता व बालकांना योग्य आरोग्यसुविधा, पोषण व बालपणातील सुरुवातीची काळजींची उपलब्धता करून निरोगी सुरुवात झाल्या, बालकांची शारीरिक, भावनिक वाढ उत्तम होते.
दोन महिन्यांच्या काळात, मोहिमेच्या पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरणावर भर दिला जाईल आणि आमच्या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील एक वर्षाखालील 30,513 बालकांना सर्व जीवनरक्षक लसी मिळतील, याची खात्री केली जाईल. मोहिमेच्या काळात, कुपोषण, मातेची काळजी, आयसीडीएस केंद्रांची, तसेच माता व बालकांसाठी असलेल्या सेवांची उपलब्धता या अन्य विषयांवरही लक्ष केंद्रित केले जाईल. ही मोहीम वर्षभर सुरू राहाणार आहे आणि मोहिमेचे उद्दिष्ट 2,81,045 बालकांच्या जीवनाची सुरुवात निरोगी होईल, यासाठी प्रयत्न करणे हे आहे.
माता व बालकांच्या आरोग्यासाठी प्रभावी व दर्जेदार सेवा देण्यासाठी, मातेची काळजी, पूर्वप्रसूतीबाबतच्या, बालकाच्या आरोग्यविषयक गरजा यावर उपाय करण्यासाठी याविषयी समुदायांमध्ये जागृती करून; पालकांना आरोग्य सेवांविषयी माहिती देऊन; आव्हानांवर मात करण्यासाठी पर्याय शोधून आणि या सेवांची उपलब्धता करून क्राय आणि क्रायचे तळागाळातील भागीदार स्थानिक सार्वजनिक आरोग्यसेवा आणि अंगणवाडी केंद्रे यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि पात्र आरोग्य कार्यकर्ते मिळण्यासाठी काम करत आहेत.
या मोहिमेमुळे, सर्वसाधारण लोक, स्वयंसेवक असे अन्य घटकही विविध कार्यक्रम आणि ऑन-ग्राउंड उपक्रम यामुळे एकत्र आणले जाणार आहेत. या विषयासंबंधी जागृती करण्यासाठी या बालकांना निरोगी व आनंदी जीवन मिळावे, यासाठी बदल घडवण्यासाठी लोकांनीही योगदान द्यावे, यासाठी विनंती करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
