मुंबई मेट्रोच्या प्रस्तावीत दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसची स्वाक्षरी मोहिम… - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई मेट्रोच्या प्रस्तावीत दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसची स्वाक्षरी मोहिम…

Share This
मुंबई मेट्रोच्या प्रस्तावित दरवाढीविरोधात मुंबई कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. ही प्रस्तावित दरवाढ अन्यायकारक असल्याने ही प्रस्वावित दरवाढ त्वरित मागे घ्यावी किंवा कमी करावी अशी मागणी मुंबई कॉंग्रेसने केली आहे.

त्यासाठी मुंबई कॉंग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली आहे.  अंधेरी पूर्व मेट्रो स्थानकात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या उपस्थितीत या स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात झाली. माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली असून तीन दिवस ही मोहीम सुरु राहणार आहे. मेट्रोच्या प्रवाशांनी या मोहिमेत सहभाग घेत स्वाक्षरी करून दरवाढीला विरोध केला. मुंबई कॉंग्रेसच्या या स्वाक्षरी मोहिमेस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. रिलायन्सने केलेली ही प्रस्तावीत दरवाढ सरकारने मागे घ्यावी किंवा किमान कमी करावी यासाठी सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी मुंबई काँगेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली.

सदरप्रसंगी मुंबई काँगेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आमदार अशोकभाऊ जाधव, मुंबई काँगेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर, भुषण पाटील, सचिव क्लाईव्ह डायस, बंधु राय, माजी नगसेविका रुपाली पावसकर आणि कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages