एलईडी दिव्यांच्या राजकारणात भाजपची सेनेवर मात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एलईडी दिव्यांच्या राजकारणात भाजपची सेनेवर मात

Share This
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) -, मरीनलाईन्सवर एलईडी दिवे लावण्यावरून शिवसेना आणि भाजपात मोठे राजकारण शिजले. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी एलईडी दिवे लावण्यास भाजपला थेट विरोध केला होता. पिवळे एलईडी दिवे लावण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांना दिल्यामुळे एलईडी दिव्यांच्या राजकारणात भाजपने सेनेवर मात केल्याचे दिसून येत आहे. 

मरीन लाईन्सवरील पिवळे दिवे काढून पांढरे एलईडी दिवे लावण्याचा निर्णय भाजपने परस्पर घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली. एलईडी दिव्यांमुळे वीजेच्या दिव्यांचा भुर्दंड पालिकेवर पडणार नाही असा दावा भाजपने केला होता. मात्र शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी राणीचा कंठहार चोरीला गेल्याच्या आरोपाने खळबळ उडवून दिली होती. अजूनही एलईडी दिव्यांचा वाद संपला नव्हता. अखेर उच्च न्यायालयाला त्यात हस्तक्षेप केला. पूर्वीचे सौदर्य रहावे यासाठी पांढरे दिवे बदलून पूर्वीचे परंतू एलईडी दिवे लावण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. आता न्यायालयाने आदेश दिल्यामुळे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पिवळे एलईडी दिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या सभागृहात आणि स्थायी समितीत एलईडी दिव्यांनी पेट घेतला होती. शिवसेनेच्या सदस्यांनी एलईडी दिव्यांच्या भाजपच्या योजनेला कडाडून विरोध केला होती. पालिकेची परवानगी न घेता तसेच शिवसेनेला विश्‍वासात न घेता अचानक पिवळे दिवे काढल्याने आणि तेथे एलईडी दिवे लावल्याने शिवसेनेच्या  जिव्हारी लागले होते. न्यायालयाच्या निर्णयाने शिवसेनेला आपला विजय झाल्याची भावना झाली होती. मात्र पिवळे दिवे पण एलईडीचे लावा असे न्यायालयाने आदेश न्यायालयाने दिल्याने भाजपचीच सरशी झाल्याचे दिसत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages