यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कृषी विज्ञान विद्याशाखेचे शिक्षणक्रम आणि बी.एड. शिक्षणक्रम वगळून अन्य शिक्षणक्रमांसाठी विलंब शुल्क आकारून 14 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येतील, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष 2015-16 पासूनचे सर्व प्रवेश ऑनलाइन पद्धतीने केले जात असून, विद्यार्थ्यांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या संगणकावर ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी विद्यापीठाने राज्यात विभाग केंद्रनिहाय मदत केंद्रे नेमली आहेत. प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून घरबसल्या ऑनलाइन प्रवेश अर्ज भरू शकतात. मात्र, ज्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे शक्य नाही, असे विद्यार्थी विद्यापीठाने निर्धारित केलेल्या सेवा केंद्रांतून अथवा सायबर कॅफेच्या माध्यमातूनही प्रवेश अर्ज भरू शकतात. मुक्त विद्यापीठाची राज्यात आठ विभागीय केंद्रे कार्यरत असून, तेथेही प्रवेश घेण्यासाठी मदत मिळू शकते. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेसंदर्भात काही अडचण असल्यास मुक्त विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर संपर्क साधावा. विद्यापीठाने दिलेल्या वाढीव प्रवेश मुदतीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.