गृहनिर्माण संस्थांची माहिती यूट्यूबवर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गृहनिर्माण संस्थांची माहिती यूट्यूबवर

Share This
मुंबई : रखडलेले पुनर्विकास, अभिहस्तांतरणाचे प्रश्न, गृहनिर्माण संस्थांना भेडसावणारे प्रश्न, पुनर्विकासाचे नियम-अटी अशा विविध प्रश्नांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध झाली असून यूट्यूबवर महाराष्ट्र सोसायटीजच्या चॅनेलवर तब्बल विविध विषयांवरील २५0 व्हिडीओज डाऊनलोड करण्यात आले असल्याचे माहिती संस्थेचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी दिली आहे.
 
महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचा स्तुत्य उपक्रमकाही दिवसांपूर्वी ठाकुर्ली येथील कोसळलेल्या इमारतीचे उदाहरण असो किंवा ऐन पावसाळ्यात स्लॅब कोसळण्याची दुर्घटना असो, या गंभीर प्रश्नांची दखल गृहनिर्माण सोसायट्यांनी घेणे अपेक्षित असते. गृहनिर्माण सोसायट्यांकडे असलेल्या अधिकारांची तसेच त्यांच्या माध्यमातून कोणते निर्णय घेता येतील, याची माहिती सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना नसते, तर कधी पुनर्विकासाबाबत कोणत्या अटी-शर्ती लागू कराव्यात अथवा पुनर्विकास, स्ट्रक्चरल ऑडिट, अभिहस्तांतरण, मानीव अभिहस्तांतरण याबद्दलही पुरेशी माहिती सोसायट्यांना तसेच सदस्यांना असतेच असे नाही. काही वेळेस गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न लहान असले तरी महत्त्वाचे असतात. अशा वेळेस नेमके मार्गदर्शन कुणाकडून घ्यावे, याबाबत संस्थांना तसेच सदस्यांना माहीत नसते. म्हणूनच महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष रमेश प्रभू यांनी गेली अनेक वर्षे सोसायट्यांचे प्रश्न, विशेषत: पुनर्विकास आणि अभिहस्तांतरणाबाबत चर्चासत्रातून मार्गदर्शन करण्याचा विडा उचलला आहे. गेल्या १0 वर्षांहूनही अधिक काळात हजारो गृहनिर्माण संस्थांना मार्गदर्शन केल्यानंतर आपले अनुभव, तसेच गृहनिर्माण क्षेत्रातील बदलते नियम, सदस्यांचे प्रश्न, पुनर्विकास याबाबतची माहिती देणारे एक न्यूज चॅनेल प्रभू यांनी यूट्यूबवर सुरू केले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages