१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या याकुब मेननला ३० जुलै नागपूर कारागृहात फाशी देण्यात आली. याकुबवर मुंबई मध्ये मार्च १९९३ मध्ये जे बॉम्ब स्फोट झाले त्यामध्ये सहभागी लोकांना प्रशिक्षणासाठी दुबई व पाकिस्तानला नेण्याचा, बॉम्ब स्फोटाच्या बदल्यात पैसा पुरवण्याचा आरोप होता. हे बॉम्ब स्फोट दाउद च्या मदतीने पाकिस्तानने केल्याचा आरोप केला जात होता. परंतू तसे पुरावे नव्हते. हे सर्व कागदोपत्री पुरावे याकुब मेननने आत्मसमर्पण केल्यावर भारतातील तपास यंत्रणांना दिले. याकुबने दिलेल्या पुराव्यानुसार हा खटला पुढे अंतिम टप्प्या पर्यंत आला अनेकांना या मध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. याकुबला फाशी दिल्या नंतर आता या दोषी लोकांनाही सजा दिली जाईल.
परंतू बॉम्ब स्फोट घडवण्याचा कट रचणारा दाउद आणि टायगर मेनन ( याकुबचा भाऊ ) अद्याप पोलिसांना आणि तपास यंत्रणांना सापडलेले नाहीत. आता पर्यंत कट रचणाऱ्या दाउद आणि टायगर मेनन यांच्या पर्यंत तपास यंत्रणांना पोहचता आलेले नाही. अद्याप या लोकांपर्यंत तपास यंत्रणा पोहचू शकत नसल्याने या आरोपींना भारतात कधी आणले जाईल का या बाबत प्रश्नचिन्ह आहे. हे बॉम्ब स्फोट घडण्या मागची कारणेही सर्वाना माहित आहेत. ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मश्जीद पाडण्यात आली. हि मश्जीद हिंदुनी पाडली. बाबरी मश्जीद पाडताच भारतात अनेक ठिकाणी दंगली सुरु झाल्या. हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण झाली.
परंतू बॉम्ब स्फोट घडवण्याचा कट रचणारा दाउद आणि टायगर मेनन ( याकुबचा भाऊ ) अद्याप पोलिसांना आणि तपास यंत्रणांना सापडलेले नाहीत. आता पर्यंत कट रचणाऱ्या दाउद आणि टायगर मेनन यांच्या पर्यंत तपास यंत्रणांना पोहचता आलेले नाही. अद्याप या लोकांपर्यंत तपास यंत्रणा पोहचू शकत नसल्याने या आरोपींना भारतात कधी आणले जाईल का या बाबत प्रश्नचिन्ह आहे. हे बॉम्ब स्फोट घडण्या मागची कारणेही सर्वाना माहित आहेत. ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मश्जीद पाडण्यात आली. हि मश्जीद हिंदुनी पाडली. बाबरी मश्जीद पाडताच भारतात अनेक ठिकाणी दंगली सुरु झाल्या. हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण झाली.
या दंगली दरम्यान निर्माण झालेली तेढ कमी करण्याचे सोडून पोलिसांनीही मुस्लिम समाजावर अन्याय केला. पोलिस यंत्रणाच मुस्लिम विरोधी वागली आणि मुस्लिम समाजात याबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला. याच दंगलीत हिंदू समाजातील लोकांनाही याची झळ पोहोचली पण त्या पेक्षा कित्तेक पटीने मुस्लिम समाजाला दंगलीची झळ पोहोचली होती. याच दंगलीत टायगर मेननचे कार्यालयही जाळण्यात आले होते. आपले कार्यालय जाळल्याचा आणि मुस्लिम समाजावर झालेला अन्याया मुळे टायगर ने कराची आणि दुबई येथे संपर्क साधून याचा बदला म्हणून मुंबईमध्ये बॉम्ब स्फोट घडवले होते.
सरकारने आता याकुबला फाशी दिल्याने सरकारचा न्याय अर्धवट असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सरकारने बॉम्ब स्फोटाला कारणीभूत असलेल्या १९९२ च्या दंगलीला कारणीभूत कोण आहेत हे श्रीकृष्ण आयोगाने स्पष्ट केले आहे. श्रीकृष्ण आयोगाने ज्यांना या दंगलीसाठी दोषी ठरवले आहे अश्या कोणावरही सरकारने अद्याप कारवाई केलेली नाही. १९९३ चे बॉम्ब स्फोट हे १९९२ च्या दंगलीला प्रतिक्रिया म्हणून करण्यात आले आहेत. १९९२ ला दानागल झालीच नसती तर १९९३ ला बॉम्ब स्फोटहि झाले नसते हे सरकारला सांगण्याची गरज नाही. परंतू सरकार १९९२ मध्ये दंगली घडवणाऱ्या लोकांवर कारवाई करू इच्छित नाही हे सत्य आहे. एखाद्या समाजाला सरकारच्या आणि व्यवस्थेच्या विरोधात जाऊन इतके मोठे कारस्थान करावे का लागते याचा सरकारने विचार करायला हवा.
१९९२ च्या दंगली घडवण्यासाठी कित्तेक नामवंत दोषी आढळले असल्याचे श्रीकृष्ण आयोगाने म्हटले आहे. अश्या लोकांवर कारवाई करायची हिम्मत कोणत्याही सरकारमध्ये नाही. त्यातच केंद्रात आलेले अच्छे दिन आणणाऱ्या मोदींच्या सरकारला एका वर्ष झाले तरी अच्छे दिन आणता आलेले नाहीत. अच्छे दिन आणणाऱ्या मोदींचे सरकार असताना भारतात गुतंवणूक करण्यास गुतंवणूकदारांनी हवा तसा प्रतिसाद दिलेला नाही. प्रधानमंत्री विदेश दौरे करत असलेल तरी या दौऱ्या दरम्यान त्यांच्या इतर देशांना भेटी देण्याची इच्छा पूर्ण होत असली तरी भारतासाठी गुतंवणूक मात्र येत नसल्याने या भेटींचे हवे तसे फळ भारताला मिळत नाही.
भारतातील महागाई, बेरोजगारीचे प्रश्न आहे तसेच आहेत. सरकारने कंपन्या चालवणाऱ्या मालकांना सोयीस्कर होतील असे कामगार कायदे बदलले आहेत. यामुळे नागरिकांना एक वर्षापूर्वी दाखवलेले अच्छे दिनचे स्वप्न सरकारला पुरण करता आलेले नाही. यामुळे सरकार विरोधात नागरिकांमध्ये चीढ निर्माण झाली आहे. लोकांमध्ये सरकार विरोधी चर्चा होऊ लागली होती. हि चर्चा कुठे तरी थांबवून सरकारला नागरिकांचे लक्ष इतरत्र वळवायचे होते. हे मन वळवण्याचे काम याकुबच्या फाशीच्या निमित्ताने झाले आहे. सर्वत्र याकुबच्या फाशीची उलट सुलट चर्चा होत असल्याने लोकांचे इतर प्रश्नांवरून लक्ष आता वळले आहे.
याकुबला फाशीच्या निमित्ताने आणखी एक चर्चा होत आहे. सरकारला मदत केल्यास सरकारकडे शरणागती पत्करल्यास सरकार दिलेला शब्द पाळू शकत नाही. सरकारने याकुबला फासावर लटकवल्याने सरकार विरोधात मुस्लिम समाजात असंतोष निर्माण करण्यात सरकारला यश आले आहे. मुस्लिम समाजात इतका असंतोष आहे कि आता काही झाल्यास कधीही दंगली होऊ शकतात. सरकारला सुद्धा तेच हवे आहे. लोकांचे प्रश्न बाजूला पडून लोकांचे लक्ष इतरत्र वळवले तरच सरकारचे सराव पातळ्यावरचे अपयश झाकायला सरकारला वेळ मिळणार आहे.
भारतातील नागरिकांनी मात्र हे कारस्थान लगेच ओळखण्याची गरज आहे. कोणताही मुद्दा आज दंगलीला कारणीभूत ठरू शकतो. भारतात दंगली घडू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. सरकारनेही लोकांचे प्रश्न कसे लवकरात लवकर सुटतील महागाई कशी कमी होईल रोजगार कसे मिळतील याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील याकुबला फाशी देण्यात सरकारने जेवढे आपले कर्तुत्व दाखवले तितकेच कर्तुत्व दाखवून १९९२-१९९३ ची दंगल आणि बाबरी मस्जीद पाडणाऱ्या दोषी लोकांवरही कारवाई करावी. तरच सरकार सर्वाना समान न्याय देते हा संदेश नागरिकांपर्यंत जाईल. अन्यथा सरकार फक्त काही विशिष्ट समाजाला न्याय आणि इतरांवर अन्याय करते असा समाज नागरिकांचा होईल.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३





No comments:
Post a Comment